दिल्ली- गोवा गोमांस तस्करीचे पर्दाफाश; चिकन पार्सलच्या नावाखाली सुरू होते नेटवर्क

दिल्ली- गोवा गोमांस तस्करीचे पर्दाफाश; चिकन पार्सलच्या नावाखाली सुरू होते नेटवर्क

दिल्ली- गोवा गोमांस तस्करीचे नवे प्रकरण आता उघडकीस आले आहे. मडगाव स्थानकात चिकन पार्सल असे लेबल असलेल्या पार्सनमधून असह्य दुर्गंधी येत असल्याने ही तस्करी उघडकीस आली आहे. अशा प्रकारे तस्करीचे नेटवर्क अनेक वर्ष सुरू असल्याची शंका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या कारवाईत सुमारे 1.5 लाख रुपये किमतीचे 514.5 किलो गोमांस जप्त करण्यात आले.

मडगाव रेल्वे स्थानकावर 500 किलोपेक्षा जास्त कुजलेले गोमांस आढळले. त्यामुळे दिल्लीहून गोव्यात खोट्या कागदपत्रांखाली गोमांस वाहतूक करणाऱ्या तस्करीचा प्रकार उघडकीस आला. पार्सलवर चिकन असे लेबल लावण्यात आले होते आणि रेल्वेच्या तपासणी यंत्रणेतील त्रुटींमुळे हे नेटवर्क सुरू होते. आता अधिकारी यामागच्या मोठ्या नेटवर्कची चौकशी करत आहेत.

मडगाव रेल्वे स्थानकावर 500 किलोपेक्षा जास्त कुजलेले गोमांस सापडले. चिकन असे लेबल असलेल्या पार्सलमधून येणाऱ्या असह्य दुर्गंधीमुळे ही जप्ती सुरू झाली होती. त्यामुळे खोट्या कागदपत्रांखाली दिल्लीहून गोव्यात गोमांस वाहतूक करणाऱ्या एका अत्याधुनिक नेटवर्कचा पर्दाफाश झाला आहे. असे दिसून येते की तस्कर रेल्वेच्या पार्सल तपासणी यंत्रणेतील त्रुटींचा फायदा घेत नियमितपणे अशाच प्रकारच्या कारवाया केल्या जात होत्या, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या छाप्यात सुमारे 1.5 लाख रुपये किमतीचे 514.5 किलो गोमांस जप्त केले. ही खेप दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरून निघाली आणि गोव्यात वितरणासाठी जात होती. उष्ण हवामानामुळे मांस अकाली खराब झाले नसते तर हे नेटवर्क उघडकीस आले नसते, असे तपासाशी संबिधीत असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले. दुर्गंधी इतकी प्रचंड झाली की त्याकडे दुर्लक्ष करणे अशक्य होते. तस्करांना रेल्वेच्या पार्सल सेवेमध्ये अत्याधुनिक तपासणी तंत्रज्ञानाचा अभाव होता. याची तस्करांना माहिती होती. त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला.

गोव्यात बेकायदेशीर कत्तलखान्यांवर झालेल्या कारवाईमुळे इतर राज्यांमधून आयात केलेल्या गोमांसाची मागणी वाढल्याचे सूत्रांनी सांगितले. हिंदू संघटनांच्या दबावानंतर गोव्यात स्थानिक अधिकाऱ्यांनी अनधिकृत गोवंश कत्तलीविरुद्ध कडक कारवाई केली आहे. त्यामुळे अशाप्रकारे तस्करी होत असल्याचे सांगण्यात येत आहे. हे प्रकरण अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या मोठ्या कारवाईतील हिमनगाचे टोक असू शकते. आम्ही अनेक महत्त्वाचे पुरावे शोधत आहोत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कर्जत- जामखेडमध्ये रंगणार  ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा, 26 ते 30 मार्चदरम्यान आयोजन  कर्जत- जामखेडमध्ये रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा, 26 ते 30 मार्चदरम्यान आयोजन 
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून यंदाची ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा कर्जत-जामखेड मतदारसंघातील कर्जत येथे 26 ते 30 मार्च या कालावधीत पार...
लख लख सोनेरी तेजाची न्यारी दुनिया! सोने 91 हजारांवर… लवकरच लाखावर जाणार!
लाहीलाही! पारा चाळिशी पार, पुढील पाच दिवस तापमान स्थिर राहण्याची शक्यता
धरणांमध्ये उरला अर्धाच पाणीसाठा; मेमध्ये टँकर माफियांचे फावणार, महाराष्ट्रावर भीषण पाणीटंचाईचे सावट
परीक्षण – थरारक आणि रक्त गोठवणारं!
डोक्याला शॉट… आपण रोज दूध नव्हे कपड्याचा साबण पितोय! राज्य सरकारची विधानसभेत कबुली… होय, दुधात भेसळ होतेय
अभियंत्यांनी रात्रीही रस्त्यांच्या कामावर उपस्थित राहावे! अतिरिक्त पालिका आयुक्तांचे निर्देश