फडणवीस-अदानींची मध्यरात्री बंद दाराआड दीड तास चर्चा
मुंबईत उद्योगपती गौतम अदानी यांच्या हालचाली वाढल्या आहेत. शनिवारी रात्री उशिरा सागर बंगल्यावर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीतील तपशील बाहेर आला नसला तरी मुंबईतील धारावी, गोरेगावमधील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पांबरोबरच कुर्ला, वरळी डेअरी व अन्य भूखंडांबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सरकारने टीडीआरचे दर मर्यादित ठेवले असले तरी इतर बिल्डर्सना त्यांच्या प्रकल्पांसाठी टीडीआर वापरायचा असेल तर किमान 40 टक्के टीडीआर धारावी प्रकल्पातून म्हणजेच अदानींकडून खरेदी करावा लागणार आहे. त्यावरही चर्चा झाल्याचे कळते. फडणवीस-अदानी यांच्यात दोन तास चर्चा झाली. रात्री दहाच्या सुमारास सागरवर गेलेले अदानी मध्यरात्री 12 वाजून 10 मिनिटांनी सागर बंगल्यातून बाहेर पडले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List