मारलेल्या कोब्राला घेऊन थेट हॉस्पिटल गाठले
कोब्रा जातीच्या सापाने एका व्यक्तीला तब्बल 4 वेळा चावा घेतला. परंतु, त्या व्यक्तीने न घाबरता त्याला मारले आणि प्लॅस्टिकच्या पिशवीत त्याला भरून थेट हॉस्पिटल गाठल्याची घटना ओदिशाच्या मयूरभंज येथे घडली. त्याच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले.
अजित कर्मकार नावाच्या व्यक्तीला झुडूपात लपून बसलेला कोब्रा डसला. तपासणीवेळी आम्हाला अजितच्या शरीरावर कोब्राने दंश केलेल्या खुणा आढळल्या. शरीरात विष पसरत होते. त्याच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले. कोब्राने दंश केल्याचे कळल्यामुळे आम्हाला त्याच्यावर तत्काळ उपचार करणे सोपे गेल्याचे आणि त्याचा जीव वाचल्याचे डॉक्टर राजकुमार नायक यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List