अंकिता लोखंडेसह 25 कलाकारांची फसवणूक; तक्रार दाखल; जाहिरात केली, पण सर्व चेक बाउन्स
सेलिब्रिटी मॅनेजिंग कंपनीने एका एनर्जी ड्रिंक कंपनीविरुद्ध अंकिता लोखंडे, तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांसह 25 सेलिब्रिटींची फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संबंधित कंपनीने कलाकारांकडून एनर्जी ड्रिंक्सची जाहिरात करून घेतली, पण चेक बाउन्स झाल्यामुळे त्यांची फसवणूक झाली. कंपनीने सेलिब्रिटींचे 1.5 कोटी रुपये देणे बाकी आहे. सेलिब्रिटी मॅनेजिंग कंपनीचे रोशन गॅरी यांनी तनिश छेडजा, मनू श्रीवास्तव, फैसल रफिक, अब्दुल आणि ऋतिक पांचाळ या पाच जणांविरुद्ध मुंबईतील चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
तक्रारीनुसार, रोशन गॅरी हा एक जाहिरात कंपनी चालवतो. तो जाहिरातींसाठी प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत काम करतो. गतवर्षी जुलैमध्ये त्याला एका व्यक्तीचा फोन आला आणि एका एनर्जी ड्रिंक ब्रँडसाठी 25 सेलिब्रिटींसोबत काम करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. यासाठी 10 लाख रुपये आगाऊ जमा करण्याबद्दल सांगितले होते. तशी पावतीदेखील पाठवली होती. मात्र खात्यात कोणतेही पैसे आले नाहीत. काही वेळाने आरोपीने पुन्हा त्याच्याशी संपर्क साधला आणि दादरमध्ये पार्टी आयोजित करण्यासाठी सेलिब्रिटींची आवश्यकता असल्याचे सांगितले. यासाठी एकूण 1 कोटी 32 लाख रुपये निश्चित करण्यात आले होते.
सना सुलतान, भूमिका गुरुंग, ध्वनी पवार, सना मकबूल, अंकिता लोखंडे, आयुष शर्मा, अभिषेक बजाज, अद्रिजा रॉय, मिकी शर्मा, रिद्धिमा पंडित, जय भानुशाली, कुशल टंडन, विभा आनंद, बसीर अली, नियती फतनानी, पार्थ कलनावत, समर्थ जुरैल, हेली शाह, कशिश, अंकित गुप्ता, मोहित मलिक, विजयेंद्र कुमरिया, जन्नत जुबैर, तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा या 25 सेलिब्रिटींची फसवणूक झाली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List