महाराणा प्रताप यांचे वंशज अरविंद सिंह मेवाड यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन
उदयपूरच्या राजघराण्यातील सदस्य अरविंद सिंह मेवाड यांचे वयाच्या 81 व्या निधन झालं आहे. ते बऱ्याच काळापासून आजारी होते आणि सिटी पॅलेसमधील शंभू निवास येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. अरविंद सिंह मेवाड हे महाराणा प्रताप यांचे वंशज होते. त्यांचे वडील भागवत सिंह मेवाड आणि आई सुशीला कुमारी मेवाड होते.
त्यांचे मोठे बंधू भाऊ महेंद्र सिंह मेवाड यांचे गेल्या वर्षी 10 नोव्हेंबर 2024 रोजी निधन झाले होते. अरविंद सिंह यांच्या निधनानंतर सिटी पॅलेस पर्यटकांसाठी बंद करण्यात आलं आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी 7 वाजता अंत्यसंस्कार केले जातील.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List