मुंबईत आज घुमणार शिवरायांचा जयजयकार! गोरेगावमध्ये भव्य शिवजयंती उत्सव; शिवसेना मध्यवर्ती शाखेचे आयोजन

मुंबईत आज घुमणार शिवरायांचा जयजयकार! गोरेगावमध्ये भव्य शिवजयंती उत्सव; शिवसेना मध्यवर्ती शाखेचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त उद्या मुंबईत शिवरायांचा जयजयकार घुमणार आहे. गोरेगाव पश्चिममध्ये एस. व्ही. रोडवरील शिवसेना रुग्णवाहिका मध्यवर्ती शाखेच्या वतीने भव्य सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवप्रतिमेची प्रतिष्ठापना सकाळी 9.30 वाजता शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे तसेच श्री सत्यनारायणाची महापूजा सायंकाळी 6 वाजता होणार आहे. त्याचबरोबर सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे आणि शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व शिवभक्त, ज्येष्ठ पुरुष व महिला पदाधिकारी, माजी नगरसेवक, शाखाप्रमुख, शाखा संघटक महिला, पुरुष गटप्रमुख, ज्येष्ठ शिवसैनिक, युवासेना, व्यापारी संघटना यांनी उपस्थित राहून शिवसोहळय़ाची शोभा द्विगुणित करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सीएसएमटीमध्ये शिवजयंती उत्सव

शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक 12 च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे कायमस्वरूपी छत्रपती शिवाजी महाराजांचा मेघडंबरी पुतळा बसवण्यात यावा या मागणीकरिता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची प्रतिष्ठापना व पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. यावेळी शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत, उपनेते रवींद्र मिर्लेकर, राजकुमार बाफना, अरुण दुधवडकर, अशोक धात्रक यांच्यासह शिवसैनिकांसहित मोठय़ा संख्येने शिवजयंती उत्सवात सहभागी होणार आहेत. सोमवार, 17 मार्चला सकाळी 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे शिवसैनिकांसहित सर्वांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विभागप्रमुख संतोष शिंदे आणि विभाग संघटिका युगंधरा साळेकर यांनी केले आहे.

घाटकोपर पूर्वेच्या शिवसेना शाखा क्र. 131 च्या वतीने शिवजयंतीनिमित्त मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना विभागप्रमुख सुरेश पाटील आणि विभाग संघटिका प्रज्ञा सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. यावेळी डोंबिवली संपर्कप्रमुख प्रकाश वाणी, विधानसभा प्रमुख अवी राऊत, विधानसभा संघटक विजय चपटे, महाराष्ट्र राज्य शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सेनेचे सचिव सचिन भांगे, शाखाप्रमुख विशाल चावक, पूनम परब, अजित नेवाळकर, अनंत खरात, कमलेश राजपूत, मुकुंद लब्दे, मधुकर घोलेकर, रमेश सावंत, कैलास गोसावी, दिनकर मांडले, वसंत पाटील, चंद्रकांत हळदणकर, चित्रकला स्पर्धेच्या निरीक्षिका विलासिनी सावंत आदी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा
शंभर दिवसांत एक बळी गेला आहे. सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरद...
‘शिवा’ मालिकेत मोठा ट्विस्ट; सीताईने लावला शिवावर मोठा आरोप
शिवजयंतीपूर्वी ‘छावा’चा जगभरात डंका; बनवला वर्ल्डवाइड नवीन रेकॉर्ड
वयाच्या 59 व्या वर्षी सलमान खानही चढणार बोहल्यावर? भाईजानच्या ‘लव्ह लाईफ’बद्दल आमिर खानचा मोठा खुलासा
बडोदा कार अपघातप्रकरणी जान्हवी कपूरची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली ‘अशा प्रकारच्या वागण्याने..’
दहशतवादी अबू कतालच्या हत्येनंतर ‘हे’ 5 सिनेमे ट्रेंड, दहशतवाद्यांच्या घृणास्पद कृत्यांचा पर्दाफाश करणारे सिनेमे
शिवरायांनी आधी बेईमान, गद्दारांना तलवारीचे पाणी पाजले; नंतर मुघलांना भिडले, मोदी-फडणवीसांचं नाव घेऊन संजय राऊत स्पष्टच बोलले