पाकिस्तानात हिंदुस्थानी गाण्यांवर नाचण्यास बंदी
पाकिस्तानात सरकारी आणि खासगी महाविद्यालयांमध्ये हिंदुस्थानी गाण्यांवर नाचण्यास बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील उच्च शिक्षण विभागाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. महाविद्यालयांमध्ये निरोप समारंभ, क्रीडा महोत्सव आणि इतर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांनी हिंदुस्थानी गाण्यांवर ठेका धरणे अनैतिक आणि अश्लील कृती म्हणून घोषित करण्यात आले आहे.
पंजाब सरकारच्या सार्वजनिक सूचना संचालनालयाने महाविद्यालयांसाठी जारी केलेल्या अधिकृत पत्रात म्हटले आहे, महाविद्यालयात शिक्षण मिळते. त्यामुळे हे एक पवित्र स्थान आहे. त्यामुळे येथे नाचगाण्याचे उपक्रम आयोजित करू नयेत. विशेषतः हिंदुस्थानी गाण्यांवर नाचू नये. आदेशाचे पालन न केल्यास महाविद्यालयाचे प्राचार्य, उपसंचालक आणि इतर अधिकाऱयांवर कडक शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.
पंजाब प्रांताच्या उच्च शिक्षण विभागाचा आदेश
गेल्याच महिन्यात कराची येथील दाऊद अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यापीठात होळी खेळल्याबद्दल हिंदू आणि मुस्लिम विद्यार्थ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. 21 फेब्रुवारी रोजी दोन्ही समुदायातील काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या प्रांगणात होळीचा सण साजरा केला. त्याचे काही व्हिडीओही व्हायरल झाले. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने होळी खेळणाऱ्या हिंदू आणि मुस्लिम विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. तसेच अनेकांना नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List