अमेरिकेचा पश्चिम भागाला चक्रीवादळाचा तडाखा
अमेरिकेतील सहा राज्यांना सध्या चक्रीवादळाने घेरले असून त्यात 34 जणांना जीव गमवावा लागला आहे. ही सर्व राज्ये पश्चिमेकडील आहेत. येथील अर्कांसस, कॅन्सस, मिसुरी, इलिनॉय, मिसिसिपी आदी राज्यांमध्ये एकूण 26 वादळे आल्याची माहिती आहे. शनिवारी, रविवारी या दोन दिवसांत मिसुरीत सर्वाधिक 12 जणांना वादळामुळे जीव गमवावा लागला.
पश्चिम अमेरिकेतील कोटय़वधी लोक या वादळांच्या विळख्यात आहेत. लाखो घरातील वीजपुरवठा वादळामुळे बाधित झाला आहे. धुळीच्या वादळामुळे 50 हून अधिक वाहनांचे अपघात झाले. यात आठ जणांचा मृत्यू झाला. मिसिसिपीत सहा जणांचा वादळामुळे मृत्यू झाला असून तीन जण बेपत्ता आहेत. ताशी 100 किलोमीटर वेगाने धुळीचे वादळ पुढे सरकत आहेत. यात घरे, वाहने, रस्ते, इमारतींचे नुकसान होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List