Monthly Periods- सखींनो फक्त प्रेग्नेंट आहात म्हणून पाळी चुकत नाही! तर मासिक पाळी चुकण्याची ही आहेत कारणे
मासिक पाळी म्हणजे एका ठराविक महिन्याच्या तारखेला येणारी असे चक्र असते. मासिक पाळीचे चक्र हे साधारणत: 28 दिवसांचे असते. परंतु अनेक महिलांमध्ये पाळी मागे पुढे होण्याचे प्रमाण खुपदा होते. पाळीचं चक्र बिघडल्यामुळे अनेकदा कंटाळा येतो. पण हे चक्र नेमकं का बिघडते याची कारणे आपण जाणून घ्यायला हवी. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आहारातील झालेला बदल हे पाळी चुकण्याचे कारण असू शकते. तसेच आपली धावती जीवनशैली सुद्धा आपली पाळी चुकण्यास कारणीभूत ठरू शकते.
पाळी चुकण्यासाठी ताणतणावही खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळेच आपल्याला जीवनशैली सुधारावी लागेल तरच आपले मासिक पाळीचे चक्र व्यवस्थित सुरु राहील. ताणतणावामुळे मासिक पाळीतील रक्तस्रावावरही परीणाम होतो. जसे की , रक्तस्त्रावाचे चे दिवस कमी किंवा जास्त होणे. त्यामुळेही पाळी चुकण्याची शक्यता असते. तसेच अनेक महिलांमध्ये रजोनिवृत्ती म्हणजे मासिक पाळी थांबण्याच्या 10 वर्षं आधीपासूनच पाळी अनियमित येण्यास सुरुवात होते.
ज्या महिलांचे वजन अचानक वाढते त्यांच्यातही पाळी चुकण्याचा जास्त संभव असतो. तसेच वजन वाढल्यामुळे शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होतात. मासिक पाळी चुकण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या सुद्धा कारणीभूत असतात. तसेच पाळी पुढे जाण्यासाठी अनेक महिला गोळ्या घेतात. त्यामुळेही पाळीचे चक्र बिघडू शकते. पाळी पुढे जाण्याच्या गोळ्या घेतल्यामुळे, पाळीसाठी उपयुक्त असलेल्या इस्ट्रोजेन नावाच्या संप्रेरकावर परिणाम होतो. त्यामुळेच अनेकदा पाळी लांबते किंवा खूपच पुढे जाते. पीसीओडी म्हणजेच गर्भाशयात असलेल्या लहान गाठी, यामुळेही पाळीचे चक्र खूपच बिघडते. अनेकदा पीसीओडी असलेल्या महिलांना सहासहा महिने पाळी येतही नाही. तसेच आपल्या शरीरात थायरॉईड ग्रंथींतील हार्मोन्सच्या अनियमिततेमुळे पाळीचे चक्र बिघडतं.
(कोणतेही उपचार करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List