होळीला वाहतूक नियमांचे उल्लंघन तेजप्रताप यांना 4 हजारांचा दंड
होळीच्या दिवशी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते आणि माजी मंत्री तेजप्रताप यादव यांना 4,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे तेजप्रताप हेल्मेट न घालता स्कूटी चालवताना आढळले. तसेच या गाडीचा विमा आणि प्रदूषण प्रमाणपत्र (पीयूसी) कालबाह्य झाले होते. वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न घातल्याबद्दल 1,000 रुपये, पीयूसी पावती नसल्याबद्दल 1,000 आणि इतर 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपयांचे चलन तेजप्रताप यादव यांना जारी केले आहे.
वाहतूक नियमांचे सर्वांनी पालन करायला हवे. राजकारणी असो की मग सामान्य नागरिक, सर्वांना नियम समान असतात, असे अधिकाऱयांनी सांगितले. आमदार तेजप्रताप हे हसनपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेजप्रताप अनेकदा त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. सध्या होळीच्या दिवशी त्यांनी पोलीस शिपायाला नाचायला भाग पाडल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List