डेटिंगऍपवर मैत्री; लग्नाचे आमिष दाखवून महिलेला 22 लाखांचा गंडा
राजधानी दिल्लीतील एका महिलेची पंजाबमधील व्यक्तीने 22 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. डेटिंगऍपच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती. 30 वर्षीय महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ती दक्षिण दिल्लीतील एका खासगी कंपनीत नोकरी करते. महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपी मूळचा पंजाब येथील असून त्याने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच दिल्लीला जाऊन खोटी आश्वासने देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
कामासाठी त्याने आर्थिक मदतीची विनंती केल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्याच्यावर विश्वास ठेवून तिने 22 लाख रुपये ट्रान्सफर केले. पण, तिने नंतर लग्नाचा विषय काढला असता त्याने टाळाटाळ करत खासगी व्हिडीओ लीक करण्याची धमकी दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List