जनआक्रोशापुढे भाजप सरकारला झुकावंच लागलं; वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्र्यांचा अखेर राजीनामा, अश्रू अनावर

जनआक्रोशापुढे भाजप सरकारला झुकावंच लागलं; वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्र्यांचा अखेर राजीनामा, अश्रू अनावर

जनआक्रोशापुढे अखेर उत्तराखंडमधील भाजप सरकारला झुकावे लागले असून अर्थमंत्री प्रेमचंद अग्रवाल यांना राजीनामा द्यावा लागला आहे. रविवार दुपारी यमुना कॉलनीतील सरकारी निवासस्थानामध्ये पत्रकार परिषद घेत प्रेमचंद अग्रवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

उत्तराखंड विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी प्रेमचंद अग्रवाल आणि विरोधी आमदारांमध्ये शा‍ब्दिक चकमक उडाली होती. यावेळी अग्रवाल यांनी हे राज्य डोंगराळ (पहाडी) लोकांसाठीच बनवलं आहे का? असा सवाल केला होता. त्यांच्या या विधानावरून सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला होता.

विरोधी पक्षाच्या आमदारांनी प्रेमचंद यांच्या माफीची मागणी केली होती. त्यानंतर राज्यभरातील जनताही रस्त्यावर उतरली आणि त्यांच्याविरोधात आंदोलन सुरू झाले. विशेष म्हणजे विरोधकांसह भाजपच्या अनेक नेत्यांनीही त्यांच्यावर हल्ला चढवला होता. त्यामुळे त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला होता. अखेर रविवारी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्याकडे सोपवला.

राजीनामा देताना काय म्हणाले प्रेमचंद अग्रवाल?

माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असून मला टार्गेट करण्यात आले, असे प्रेमचंद अग्रवाल म्हणाले. मी राष्ट्रीय व्हॉलिबॉल खेळाडू असून उत्तराखंड वेगळे राज्य व्हावे म्हणून 1994 पासून मी आंदोलन केले. माझ्यावर रासुका लावण्याचाही प्रयत्न झाला. मी नेहमी राज्यासाठी लढत राहिलो. त्यानंतरही माझ्या विरोधात वातावरण तयार करण्यात आले, असे म्हणत प्रेमचंद अग्रवाल भावूक झाले.

लाठीचार्जही सहन केला

मुजफ्फरनगरची घटना घडली तेव्हा मी दिल्लीत होतो. ती घटना बघून मला अस्वस्थ वाटल्याने मी ट्रकमध्ये बसून तिथे पोहोचले. तिथे जे पाहिले त्याचे वर्णनही करता येणार नाही. उत्तराखंडसाठी मी लाठ्या, काठ्या खाल्ल्या, असेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महत्वाची बातमी, एसटी बंद पडल्यास कोणत्याही श्रेणीच्या बसमधून त्याच तिकीटावर प्रवास महत्वाची बातमी, एसटी बंद पडल्यास कोणत्याही श्रेणीच्या बसमधून त्याच तिकीटावर प्रवास
एसटी प्रवास करताना काही वेळा तांत्रिक कारणाने बसेस बंद पडत असतात. अशा वेळी त्याच मार्गावरुन येणाऱ्या बसेसमधून प्रवास करण्याची मूभा...
रवींद्र नाट्य मंदिरात भरणार सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन!; अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार
नागपुरात दोन गटात राडा; तुफान दगडफेक, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न
Honey Bee Attack – अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला, 50 जण जखमी
कोल्हापूरचे शहीद जवान सुनिल गुजर अनंतात विलीन, शाहुवाडीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
Raigad News – एसटीमध्ये शॉर्टसर्किट, अचानक धूर पसरल्याने प्रवाशांमध्ये घबराट, बसमधून घेतल्या उड्या
ओसामा बिन लादेनच्या घरी ‘या’ बॉलिवूड कलाकारांच्या सीडी! काय आहे नेमकी भानगड?