गुलमर्ग फॅशन शोच्या आयोजकांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
गुलमर्ग फॅशन शोचा वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. जम्मू-कश्मीरमधील श्रीनगरच्या एका न्यायालयाने गुलमर्गमधील फॅशन शोच्या आयोजकांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. रमजान महिन्यात अश्लीलता पसरवणे, धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आणि सार्वजनिकरित्या मद्यपान केल्याबद्दल आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी राजकीय कार्यकर्ते आदिल नझीर खान यांनी केली. त्यांच्या तक्रारीनुसार, आयोजक, डिझायनर्स आणि शोमध्ये सहभागी झालेल्या मॉडेल्सना नोटीस पाठवण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 8 एप्रिल रोजी होणार आहे.
न्यायालयाने म्हटले की, आरोपीचे म्हणणे ऐकणे हे कायद्याने बंधनकारक आहे. याबाबत प्रकरणाशी संबंधित सर्व आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, गेल्या आठवडय़ात गुलमर्गमध्ये एक फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. सोशल मीडियावर याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले आणि यावरून राजकारण सुरू झाले. स्थानिक लोकांनीदेखील नाराजी व्यक्त केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List