Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 17 मार्च 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 17 मार्च 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

आजचे पंचाग

तिथी – फाल्गुन कृष्ण तृतीया
वार – सोमवार
नक्षत्र – चित्रा
योग – ध्रुव
करण – बव
राशी – तूळ

आज संकष्ट चतुर्थी असून चंद्रोदय रात्री 9.11 वाजता आहे.
तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जंयती आहे.

मेष

मेष राशीसाठी आजचा दिवस सर्वांचे सहकार्य मिळण्याचा आहे. मात्र, आपल्या बोलण्याने कोणी दुखावणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. चंद्र सप्तम स्थानात असल्याने हितशत्रूंवर मात करणे शक्य होणार आहे. विनाकारण वादविवाद टाळत व्यवसाय वाढीसाठी येणाऱ्या चांगल्या संधीचा फायदा घेण्याकडे लक्ष द्यावे. मन शांत ठेवत फायदा वाढवण्याचा प्रयत्न करा. सर्वांना सोबत घेत कामे करण्यावर भर दिल्यास कामाचा भार कमी होणार आहे. मात्र, व्यय स्थानात राहू असल्याने खर्चाकडे लक्ष देण्याची गरज आहे. एकादश स्थानात शनि असल्याने आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांना आज सावध राहण्याची गरज आहे. चंद्र षष्ठ स्थानात असल्याने हितशत्रू कारवाया करण्याची शक्यता आहे. मार्गी लागत असलेली कामे विनाकारण रखडल्याने अस्वस्थता वाढणार आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी सध्याचा काळ चांगला आहे. तसेच प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. कामाचा व्याप वाढणार असला तरी आगामी काळात त्याचा चांगला फायदा होणार आहे. आय स्थानात राहू असल्याने आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. प्रथम स्थानात गुरुमुळे नशिबाची चांगली साथ मिळणार आहे.

मिथुन

मिथुन राशीला आजचा दिवस सकारात्मक आणि शुभ ठरणार आहे. चंद्र पंचम स्थानात असल्याने घरातील बच्चे कंपनीकडे विशेष लक्ष ठेवावे लागणार आहे. अन्यथा त्यांच्यामुळे कामांचा व्याप वाढण्याची शक्यता आहे. दशम स्थानात राहू असल्याने कार्यक्षेत्रात सावध राहण्याची गरज आहे. कार्यस्थळी तुमचा चांगला प्रभाव वाढत असल्याने मनासारखी कामे होणार आहेत. भाग्य स्थानातील शनिमुळे अनेक चांगल्या गोष्टी जुळून येणार आहेत. मात्र, वाणीवर संयम ठेवणे गरजेचे आहे. आपली भूमिका योग्य असली तरी त्यामुळे कोणी दुखावणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे.

कर्क

कर्क राशीच्या लोकांना आज घराकडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. घरातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. घरासाठी होणाऱ्या कोणत्याही खरेदीत किंवा महत्त्वाच्या कामात कुटुंबियांचे सहकार्य मिळणार आहे. चंद्र चतुर्थ स्थानात असल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहणार आहे. नवीन गृहखरेदी आणि वाहनसुखाचे योग आहेत. त्याचा चांगला फायदा करून घेण्याचा काळ आहे. विनाकारण मनावर आलेले दडपण दूर होणार आहे. भाग्य स्थानात राहू असल्याने नशिबाची चांगली साथ मिळणार आहे. मात्र,आता लवकरच शनी भाग्य स्थानात संक्रमण करणार असल्याने अडीचीमध्ये आलेल्या अडचणी कमी होणार आहेत.

सिंह

सिंह राशीच्या लोकांचा आजचा दिवस मानसन्मानाचा आणि लाभाचा आहे. चंद्र तृतीय स्थानात असल्याने सामाजिक क्षेत्रात प्रभाव वाढणार आहे. त्याचा फायदा करून घेण्याची गरज आहे. गुरुच्या पाठबळामुळे अनेक रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. चंद्राची दृष्टी भाग्य स्थानावर असल्याने नशिबाची साथ मिळणार आहे. मात्र, नैराश्यावर मात करत पुढे जाण्याची गरज आहे. आता शनीची अडीची सुरू होणार असल्याने त्याआधीच महत्त्वाची कामे पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे.

कन्या

कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस धनलाभाचा आहे. चंद्र द्वतीय स्थानात असल्याने अनपेक्षित धनलाभ होणार आहे. गुंतवणुकीबाबतचे निर्णय घेण्यास चांगला काळ आहे. भाग्य स्थानात गुरु असल्याने उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होणार आहेत. मात्र, आलेल्या संधीचा फायदा करून घेण्याची गरज आहे. सप्तम स्थानात राहू असल्याने व्यवसायात तोटा होणार नाही, याची काळजी घ्यावी. षष्ठ स्थानात शनीचा प्रभाव कमी होत आहे. त्याचाही फायदा होणार आहे. चंद्राच्या पाठबळामुळे आर्थिख फायदा होत असल्याने वातावरण चांगले राहणार आहे.

तूळ

तूळ राशीच्या लोकांना आजचा दिवस सकारात्मक राहणार आहे. आता मनासारख्या गोष्टी होणास सुरुवात होत असल्याने उत्साह आणि आत्मविश्वास वाढणार आहे. मात्र, विनाकारण दडपण आणि नैराश्य दूर ठेवण्याची गरज आहे. चंद्र प्रथम स्थानात असल्याने आतिआत्मविश्वाने कोणतेही काम हाती घेऊ नका, अन्यथा कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. दशम स्थानात गुरु असल्याने अनेक कार्यक्षेत्रात सकारात्मक गोष्टी घडणार आहेत. षष्ठ स्थानात राहूमुळे काही अडचणी येण्याची शक्यता आहे. गुतंवणुकीबाबत विचार करण्यास चांगला काळ आहे.

वृश्चिक

वृश्चिक राशीने आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे. तसेच अनपेक्षित गोष्टींमुळे चिडचीड आणि मनस्ताप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजचा दिवस शांततेत घालवण्याचा प्रयत्न करावा. व्यय स्थानात चंद्र असल्याने अनाठायी खर्च होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. महिन्याभराचे जमाखर्चाचे गणीत जुळवून त्याप्रमाणे खर्च केल्यास नंतर पैशांची चणचण भासणार नाही. शनीची अडीची संपत आल्याने संकटातून मार्ग सापडणार आहेत. मात्र, आता आठवडाभर मनावर संयम ठेवल्यास वागणे हिताचे आहे.

धनु

धनु राशीच्या लोकांना आजचा दिवस नशीबाची चांगली साथ मिळणार असल्याने धनलाभ होऊ शकतो. जुन्या गुतंवणुकीतून धनलाभाचे योग आहेत. मात्र. हाती आलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवल्यास भविष्यात त्याचा फायदा होणार आहे. कार्यक्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. चंद्र आय स्थानात असल्याने व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नशिबाची चांगली साथ असल्याने या काळात महत्त्वाची कामे पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. चतुर्थ स्थानात राहूमुळे घरासाठी किंवा वाहनावर खर्च वाढणार आहेत. शनीची चांगली साथ मिळणार असली तरी षष्ठ स्थानातील गुरुमुळे काहीजण कामात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच त्यावर मात करणेही शक्य होणार आहे.

मकर

मकर राशीच्या लोकांना आज कामाचा ताण न घेता संयमाने प्रत्येकाच्या कलाने कामे केल्यास अडचण येणार नाही. विनाककारण चिडचीड केल्यास होणार कामही रखडू शकते. त्यामुळे आजचा दिवस संयमाने घालवण्याची गरज आहे. कर्म स्थानात शनी असल्याने वेळेत काम पूर्ण करावे. तसेच सहकाऱ्यांकडून वेळेत काम करून घेतल्याने तुमचा ताण वाढणार नाही. तृतीय स्थानातील राहूमुळे भावंडाशी मतभेद टाळण्याची गरज आहे. साडेसातीचा काळ संपत असल्याने नव्या योजनांकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच आधीच्या कामातूनही लाभ होण्याचे योग आहेत.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळणार आहे. चंद्र भाग्य स्थानात असल्याने आलेल्या प्रत्येक संधीचा फायदा करून घ्यावा. गुरु सप्तम असल्याने व्यवसाय आणि भागीदारीतून फायद्याचे योग आहेत. दुसऱ्या स्थानात राहू असल्याने कुटुंब,सहकारी आणि मित्रांचे चांगले सहकार्य मिळण्याचे योग आहेत. मात्र, शेजाऱ्यांशी वादविवाद टाळावे. संपत्तीबाबतचे वादविाद संपण्याची शक्यता आहे. आता साडेसातीचा अखेरचा टप्पा सुरू होणार असल्याने अनेक अडचणी कमी होणार आहेत. तसेच आधी केलेल्या चांगल्या कामांचे फळ मिळण्यास सुरुवात होणार आहे.

मीन

मीन राशीच्या लोकांना आजचा दिवस प्रकृतीकडे लक्ष द्यावे. तसेच पथ्यपाणी सांभाळण्याची गरज आहे. सर्वांशी गोड बोलत काम केल्यास सहकाऱ्यांची चांगली साथ मिळणार आहे. मात्र, प्रत्येक गोष्टीत मतभेद व्यक्त करणे टाळावे. अष्टम स्थानात चंद्र असल्याने दगदग आणि धावपळ टाळावी लागणार आहे. हितशत्रूंच्या कारवायांचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. व्यवसायातील संकटांवर मार्ग सापडणार असल्याने तुमचा उत्साह वाढणार आहे. प्रथम स्थानात राहू असल्याने मनावरील दडपण दूर करत सकारात्मक विचार ठेवण्याची गरज आहे. आता लवकरच साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होणार असल्याने सावध राहून कोणतेही व्यवहार करण्याची गरज आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लाडकी बहीण योजनेत दुरुस्ती करणार…अजित पवार यांची सभागृहात मोठी घोषणा लाडकी बहीण योजनेत दुरुस्ती करणार…अजित पवार यांची सभागृहात मोठी घोषणा
Ladki Bahin Yojana Important Update: महायुती सरकारची सर्वात लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांकडून टीका केली जात आहे. ही योजना...
दुसऱ्या पुरुषांकडे आकर्षित झाले, पण कधीच…, नात्यावर अलका याज्ञीक यांचं मोठं वक्तव्य
कार्तिक आर्यनची गर्लफ्रेंड केवळ 11 वर्षांनी लहान नाही तर 2 मुलांची आईसुद्धा
‘तारक मेहता’मधील सोनू पुन्हा अडकली लग्नबंधनात, 2 महिन्यात दुसऱ्यांदा चढली बोहल्यावर
वैष्णोदेवी मंदिर परिसरात ऑरीने असं काय केलं? त्याच्यासह 8 जणांवर FIR दाखल
घटस्फोटाची अफवा सुरू असतानाच ऐश्वर्या रायचं मोठं विधान; आता काय? चर्चांना उधाण
‘मी अक्षय खन्नाचा फॅन’, संतोष जुवेकरने दिले ट्रोलर्सला सडेतोड उत्तर