पाक सैन्याच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला, 90 सैनिक ठार; BLA चा दावा
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढत असलेल्या बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या सैन्याला आव्हान दिले. काही दिवसांपूर्वी जाफर एक्स्प्रेसवर हल्ला चढवत ट्रेन हायजॅक केली होती. या हल्ल्यानंतर पाकिस्तानात एकच खळबळ उडाली आहे. आता रविवारी पाक सैन्याच्या ताफ्यावर भीषण हल्ला झाला आहे.या हल्ल्याची संपूर्ण जबाबदारी बलूच लिबरेशन आर्मीने घेतली आहे. या हल्ल्यात 90 पाकिस्तानी सैनिकांना ठार केल्याचा दावा BLA ने केला आहे.
द बलुचिस्तान पोस्टच्या वृत्तानुसार, नोशिकीमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. आरसीडी महामार्गावर हा हल्ला करण्यात आला. सुरुवातीला अनेक स्फोट झाले आणि नंतर जोरदार गोळीबार झाला. या हल्ल्यानंतर अनेक रुग्णवाहिका आणि सुरक्षा दल घटनास्थळी धावताना दिसल्या. या हल्ल्याची जबाबदारी घेत बीएलएचे प्रवक्ते जीयंद बलूच यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
‘काही तासांपूर्वी बीएलएच्या एका युनिटने मजीद ब्रिगेडने नोशिकीमधील आरसीडी हायवेवरील रासखान मिलजवळ पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्याला लक्ष्य केले. या ताफ्यात आठ बसचा समावेश होता. त्यापैकी एक पूर्णपणे नष्ट झाली आहे. या हल्ल्यात आत्तापर्यत 90 सैनिक ठार झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.पाकिस्तानी सैनिकावर हल्ला केल्यानंतर बीएलएलच्या पथकाने पुढे असलेल्या एका बसला देखील घेराव घातला. दरम्यान या बसमध्ये असलेल्या सगळ्या सैनिकांवर हल्लाकरून त्यांना ठार केले, असे बीएलएचे प्रवक्ते जीयंद बलूच यांनी सांगितले.
हल्ल्यात फक्त 7 प्रवाशांचा मृत्यू PAK मीडिया
नोशिकी-दलबंदिन महामार्गावर झालेल्या हल्ल्यात फक्त 7 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे आणि 35 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पाकिस्तानी मीडियाने दिली आहे. स्फोटाचे कारण अद्याप अधिकाऱ्यांनी उघड केलेले नाही. स्फोटानंतर जखमींना ताबडतोब नोशिकी रुग्णालयात नेण्यात आले. परिस्थिती हाताळण्यासाठी मीर गुल खान नसीर शिक्षण रुग्णालयात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे आणि तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दहशतवाद्यांनी जाफर एक्प्रेस हायजॅक केली, बलुचिस्तान भागात तुफानी गोळीबार; 30 पाकिस्तानी सैनिक ठार
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List