निर्मला सीतारामन यांनीही अनेकदा तमिळ अक्षर वापरलेलं; रुपयाच्या चिन्हाच्या वादावरून स्टॅलिन यांचा अर्थमंत्र्यांवर निशाणा
तामीळनाडू सरकारने 2025-26 या वर्षाच्या अर्थसंकल्पासाठी रुपयाच्या चिन्हाच्या जागी रूबल हे तमिळ चिन्ह वापरले आहे. यामुळे तामीळनाडू सरकारवर भाजपने हल्ला चढवला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी उचललेल्या या पावलावर कठोर शब्दात टीका केली. याला आता स्टॅलिन यांनी उत्तर दिले असून निर्मला सीतारामन यांनीही अनेकदा इंग्रजीतील रुपयाच्या चिन्हाऐवजी तमिळ अक्षर वापरलेले आहे, असे ते म्हणाले. ते रविवारी पत्रकारांशी बोलत होते.
तामीळनाडू सरकारने रुपयाचे चिन्ह बदलल्यानंतर सीतारामन यांनी ही तर घातक मानसिकता असून फुटीरतावादाला प्रोत्साहन देण्यासारखे आहे अशी प्रतिक्रिया दिली होती. याला स्टॅलिन यांनीही जोरदार उत्तर दिले. रुपयाचे चिन्ह बदलणे हीच आमची भाषा धोरणाप्रति दृढता आहे, असे स्टॅलिन म्हणाले.
आम्ही अर्थसंकल्पासाठी तमिळ भाषेतील नवा लोगो प्रकाशित केला. हा लोगो त्यांना आवडला नसेल तर ती मोठी बातमी आहे. ज्या लोकांना तमिळ भाषा आवडत नाही त्यांनी हा मोठा मुद्दा बनवला आहे. आम्ही केंद्र सरकारला 100 दिवसांच्या रोजगार योजनेसाठी म्हणजेच मनरेगासाठी निधीची मागणी केली, आपत्कालीन व्यवस्थापन, शाळेसाठी निधी देण्याची विनंती केली. परंतु, अर्थमंत्र्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला नाही, त्यावर त्या का काहीच बोलत नाहीत, असा सवालही स्टॅलिन यांनी केला आहे.
अपमानास्पद मजकूर पोस्ट करणाऱ्यांची कपडे काढून धिंड काढू! मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आक्रमक
निर्मला सीतारमन यांनीही अनेक पोस्टमध्ये तमिळ अक्षर ‘रु’चा वापर केलेला आहे, असेही स्टॅलिन म्हणाले. तसेच इंग्रजीमध्येही रुपयासाठी Rs असे लिहिले जाते, असे म्हणत भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या आडून हिंदी थोपत असल्याचा पुनरुल्लेखही त्यांनी केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List