लक्षवेधक – पक्षी धडकल्याने विमान पेटले

लक्षवेधक – पक्षी धडकल्याने विमान पेटले

पक्ष्याने फेडेक्स कार्गो विमानाच्या इंजिनला धडक दिल्याने विमानाला आग लागल्याची घटना अमेरिकेत घडली. यानंतर विमानाला न्यू जर्सीतील नेवार्प विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उड्डाणादरम्यान विमानाच्या उजव्या बाजूच्या इंजिनमध्ये आग लागल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. एक मोठा स्पह्ट ऐपू आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, विमानाला आग लागली असली तरी ते सुरक्षितपणे उतरताना दिसत आहे. या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

अन् रवीना टंडन संतापली

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात अभिनेत्री कतरिना कैफ स्नान करत असताना काही लोकांनी तिचा व्हिडीओ काढला. या व्हिडीओवरून अभिनेत्री रवीना टंडनने संताप व्यक्त केला आहे. काही अतिउत्साही तरुणांनी प्रसिद्धीसाठी कतरिना स्नान करत असताना व्हिडीओ काढला आणि ‘ये में हू, ये मेरा भाई है’ असे म्हणत पॅमेरा फिरवत ‘ये कतरिना है’ असा व्हिडीओ बनवला. या घटनेचा दाखला देत हे खूपच घृणास्पद असून असे लोक त्या जागेचे आणि त्या क्षणाचे पावित्र्य खराब करत आहेत, असे रवीनाने म्हटले.

तुर्कीत 40 वर्षे जुने युद्ध संपले

तुर्कीतील कुर्दिश फुटीरतावादी आणि सरकारमधील तब्बल 40 वर्षांपासूनचा संघर्ष आता संपला आहे. कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी तुर्कीसोबत युद्धबंदीची घोषणा केली आहे. केवळ एक दिवस आधी, तुरुंगात असलेले पीकेके नेते अब्दुल्ला ओकलन यांनी संघटना विसर्जित करण्याचे आदेश दिले. उत्तर इराकमधील पीकेकेच्या शाखेने युद्धबंदीचे पालन करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच जोपर्यंत आपल्यावर हल्ला होत नाही, तोपर्यंत आपले सैन्यही कोणतीही हिंसक कारवाई करणार नाही, असेही स्पष्ट केले आहे.

7 दिवस स्वच्छता मोहीम

प्रयागराजमधील महाकुंभाच्या समारोपानंतर, संगम परिसर आणि आसपासच्या परिसरात विशेष स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम सात दिवस चालणार आहे. जत्रेच्या परिसराशी जोडलेल्या जागा, पार्ंकगची ठिकाणी आणि रस्ते स्वच्छ करण्यात येणार आहेत. तसेच बेकायदेशीर कब्जे आणि अतिक्रमणे हटवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. वारंवार होणाऱ्या अतिक्रमणांबाबत पोलीस आयुक्तांना पत्र देण्यात येणार आहे. मोहीमेदरम्यान बेकायदेशीर दुकाने हटवण्यात येणार आहेत. संगम परिसरातील रस्ते तसेच तात्पुरते पार्ंकगही स्वच्छ केले जाणार आहे.

पतीपत्नीने केले होते 3 लेखी करार

आत्महत्याग्रस्त टीसीएस मॅनेजर मानव आणि त्याची पत्नी निकिता या दोघांनी 3 लेखी करार केले होते, अशी माहिती पुढे आली आहे. मानवची बहीण आकाक्षांने सांगितल्यानुसार जुन्या गोष्टी विसरून जाऊ, कोणीही त्यांचा उल्लेख करणार नाही. तुम्ही आम्हाला हुंडा किंवा इतर कोणत्याही प्रकरणात अडकवणार नाही. तुमचे कुटुंब आमच्या आयुष्यात हस्तक्षेप करणार नाही, असे तीन लेखी करार दोघांमध्ये झाले होते. आपण दोघेही एकमेकांशी भूतकाळाबद्दल बोलणार नाही तसेच तु तुझ्या बॉयफ्रेंडशी बोलणार नाही अशी अट मानवने निकिताला घातली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

थकीत देण्यांच्या बोजाने एसटी वाकली, अर्थसंकल्पात आर्थिक पॅकेज जाहीर करा, कामगार युनियनची मागणी थकीत देण्यांच्या बोजाने एसटी वाकली, अर्थसंकल्पात आर्थिक पॅकेज जाहीर करा, कामगार युनियनची मागणी
राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन आज सोमवारपासून सुरु झाले आहे. येत्या १० मार्च रोजी राज्याचा साल २०२५-२६ चा अर्थसंकल्पा मांडला जाणार आहे....
कधी काळी अभिनेत्रीनं दिले इमरान हाश्मीसोबत किसिंग सीन; आता आहे भारताच्या या स्टार क्रिकेटरची पत्नी
केसांना आवळा लावताना या ३ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पडु शकते टक्कल
स्वारगेट प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून गुन्हेगाराला फाशी द्यावी; सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारकडे मागणी
कायद्याची भीती राहिली नसल्याने महाराष्ट्रात महिला असुरक्षित, विनायक राऊत यांची महायुती सरकारवर टीका
ऊसाने भरलेल्या बैलगाडीला दुचाकीची धडक; अपघातात अभियांत्रिकेच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
आषाढी यात्रेपूर्वी टोकन दर्शन व्यवस्थेची चाचणी; गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती