रक्षितने गेल्या महिन्यातही केले कांड; मागितली होती माफी
गुजरातमधील वडोदरा येथे भरधाव वेगाने कार चालवून तीन वाहनांना धडक देणारा आणि एका महिलेचा जीव घेणाऱ्या रक्षित चौरसियाने (20) मागील महिन्यातही गुन्हा केला होता. मात्र, पोलिसांनी केवळ माफी मागितल्यानंतर त्याला सोडून दिले. स्थानिक पोलीस ठाण्यात रक्षित आणि त्याच्या मित्रांच्या विरोधात एका वकिलाने तक्रार दाखल केली होती. एका इमारतीमध्ये आरोपी गोंधळ घालत होते. याचा त्रास होऊ लागल्याने त्याच इमारतीमध्ये कार्यालय असलेल्या तक्रारदार वकिलाने शांत राहण्याचा सल्ला दिला असता आरोपींनी दमदाटी केली.
वकिलाने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गोंधळ घालणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतले. प्रकरण अंगलट येताच रक्षित चौरसियाने तक्रारदारांची माफी मागितली. लेखी दिलगिरी लिहून दिल्यानंतर पोलिसांनी रक्षितला अभय दिले. पण, तक्रारदार आणि आरोपींनी प्रकरण मिटवून घेतल्यानंतर पोलिसांनी याबद्दल स्टेशन डायरीत कोणतीही नोंद केली नव्हती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List