दीपक पूनिया आणि अंतिम पंघालला आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी हिंदुस्थानी टीममध्ये मिळालं स्थान

दीपक पूनिया आणि अंतिम पंघालला आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी हिंदुस्थानी टीममध्ये मिळालं स्थान

जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेते दीपक पुनिया आणि अंतिम पंघाल यांचा यांना 25 ते 30 मार्च दरम्यान अम्मान, जॉर्डन येथे होणाऱ्या आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी हिंदुस्थानी संघात स्थान मिळालं आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे (WFI) आयोजित निवड चाचणीद्वारे पुरुषांच्या फ्रीस्टाइल, ग्रीको-रोमन आणि महिला कुस्तीमध्ये प्रत्येकी 10 कुस्तीपटूंची निवड करण्यात आली. अशी एकूण 30 कुस्तीपटूंची ही टीम असणार आहे.

2019 च्या जागतिक स्पर्धेत रौप्य आणि 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या दीपक पुनिया याने वजन वाढवलं असून तो 86 किलो वजनी गटाऐवजी आता 92 किलो वजनी गटात खेळणार आहे. त्याचबरोबर विशाल कालीरामन आता 65 किलोऐवजी 70 किलोमध्ये स्पर्धा करणार आहे. अंतिम पंघाल (53 किलो) आणि रितिका (76 किलो) यांनी आपापल्या गटात चाचण्या जिंकून संघात स्थान मिळवलं आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Crime news – श्रीगोंदाजवळ 19 वर्षीय तरुणाची क्रूर हत्या; हात-पाय, मुंडके तोडून विहिरीत टाकले Crime news – श्रीगोंदाजवळ 19 वर्षीय तरुणाची क्रूर हत्या; हात-पाय, मुंडके तोडून विहिरीत टाकले
हाविद्यालयीन 19 वर्षीय तरुणाची थंड डोक्याने हत्या करून, त्याचा मृतदेह पोत्यात भरून फेकून दिल्याचे उघडकीस आले आहे. तरुणाचे हात-पाय, मुंडके...
अमेरिकेचा पश्चिम भागाला चक्रीवादळाचा तडाखा
आता शमीच्या मुलीच्या होळी खेळण्यावर मौलाना संतापले
रक्षितने गेल्या महिन्यातही केले कांड; मागितली होती माफी
ओमानचा हायकमिशनर म्हणवणाऱ्या 66 वर्षांच्या ठगाची तुरुंगात रवानगी
मारलेल्या कोब्राला घेऊन थेट हॉस्पिटल गाठले
डेटिंगऍपवर मैत्री; लग्नाचे आमिष दाखवून महिलेला 22 लाखांचा गंडा