हाफिज सईदचा साथीदार अबू कतालची पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या

हाफिज सईदचा साथीदार अबू कतालची पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या

लष्कर ए तोयबाचा दहशदवादी आणि हाफिज सईदचा विश्वासू सहकारी अबू कतालची पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. जम्मू कश्मीरमधल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये अबू कतालचा सहभाग होता.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानमधील झेलम परिसरात कताल आपल्या सुरक्षा रक्षकासोबत प्रवास करत होता तेव्हा अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी हाफिज सईद देखील त्याच्याबरोबर होता. दरम्यान, या हल्ल्यानंतर हाफिज सईदने तिथून पळ काढला. तेव्हापासून तो बेपत्ता आहे.

झेलम परिसरातील दिना पंजाब विद्यापीठाजवळील झीनत हॉटेलजवळ हा हल्ला झाला. या हल्ल्यात अबू कताल आणि त्याचा एक सुरक्षा रक्षक जागीच ठार झाले. आणि एक सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला आहे.

26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा जवळचा सहकारी अबू कताल हा 9 जून रोजी जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील शिव खोरी मंदिरातून परतणाऱ्या यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या हल्ल्याचा मास्टर माईंड होता. तसेच हाफिज सईदनेच अबू कतालला लष्कराचा मुख्य ऑपरेशनल कमांडर म्हणून देखील नियुक्त केले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

डोकेदुखीची समस्या होईल दूर, आहारामध्ये ‘या’ पदार्थांचे करा सेवन… डोकेदुखीची समस्या होईल दूर, आहारामध्ये ‘या’ पदार्थांचे करा सेवन…
आयुर्वेदामध्ये असे अनेक वनसपतींबद्दल सांगितले आहेत ज्याचे सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. बदलत्या ऋतूमध्ये तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष...
शरद पवार गटात पुन्हा राजकीय भूकंप?, जयंत पाटील असं काय बोलले हसन मुश्रीफांकडे? मुश्रीफांचा दावा काय?
550 कोटींची मालक फोटोतील ही लहान मुलगी, एका चित्रपटासाठी घेते 15 कोटी, परिवारात अनेक सुपरस्टार्स
बदलत्या हवामानात फ्लूची समस्या सतावतेय, फक्त ‘या’ छोट्या गोष्टींची घ्या काळजी
तुम्हाला कलिंगड खाण्याची योग्य वेळ माहिती आहे का? चला जाणून घेऊया तज्ञांचे मत…
महाराणा प्रताप यांचे वंशज अरविंद सिंह मेवाड यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन
Ratnagiri News – आगामी काळात शिवसेनेचे अस्तित्व दाखवूनच देऊ, अमोल किर्तीकर यांनी व्यक्त केला विश्वास