निखिल आणि नितीन कामथ यांच्याकडून आईला मर्सिडीज भेट
झेरोधा कंपनीचे सह-संस्थापक निखिल कामथ आणि नितीन कामथ यांनी आई रेवती कामथ यांना त्यांच्या वाढदिवशी आलिशान एक नवीन मर्सिडीज भेट दिली आहे. लेकरांच्या या गिफ्टनंतर आईने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली आहे. ‘आज मला माझ्या मुलांनी एक नवी कोरी कार भेट दिली असून कारच्या चाव्या शालू आणि फेटा बांधून अशा पद्धतीने देण्यात आल्या,’ अशा आशयाचे कॅप्शन रेवती कामथ यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले.
रेवती कामथ यांनी भेट मिळालेल्या कारच्या चाव्या स्वीकारतानाचा फोटो शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. डोक्यावर फेटा बांधण्यात आला असून त्याचबरोबर शालदेखील पांघरण्यात आली आहे. रेवती कामथ यांना भेट म्हणून मिळालेल्या कारची किंमत 1.5 कोटी इतकी आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List