नाइट क्लबमध्ये आतषबाजीमुळे 50 जणांचा होरपळून मृत्यू
एका नाईट क्लबमध्ये सांगीतिक कार्यक्रमादरम्यान करण्यात आलेल्या आतषबाजीमुळे आगीचा भडका उडाला आणि 50 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर किमान 100 जण भाजल्याची घटना नॉर्थ मॅसेडोनिया येथील कोकानी शहरात घडली.
सुमारे 30 हजार लोकसंख्या असलेल्या या शहरातील नाईट क्लबमध्ये प्रसिद्ध हिप-हॉप जोडी एडीएनचा संगीत कार्यक्रम सुरू असताना अचानक आतषबाजी करण्यात आली. यावेळी दीड हजार प्रेक्षक उपस्थित होते. अचानक कुणीतही फटाके फोडल्याने आगीचा भडका उडाल्याचे सांगण्यात येत आहे.
आग लागल्यानंतर एकच गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरीत काही लोक चिरडले गेले. पंतप्रधान हस्टिजन मिकोव्स्की यांनी एक्सवरून याप्रकरणी दुःख व्यक्त केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List