Chembur Viral Video : मुंबईत राजकीय पक्षाच्या कार्यालयात जंगी पार्टी..
मुंबईच्या चेंबुरमधील एका राजकीय पक्षाच्या दारू पार्टीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. पक्षाचे कार्यकर्ते कार्यालयात दारू पार्टी करत असल्याचं या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे.
या व्हिडिओमध्ये काही पक्षप्रमुखांचे देखील फोटो बघायला मिळत आहेत. त्यावरून आता राजकीय वादंग निर्माण झालं असून राजकीय नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर दिल्या जात आहे. टीव्ही9 मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. मात्र हा कथित व्हिडिओ शिवसेना शाखा कार्यालयातला असल्याचं बोललं जात आहे. व्हिडिओमध्ये कार्यकर्ते बसून पार्टी करत आहेत. त्यांच्यासमोर दारूच्या बाटल्या आणि इतर गोष्टी ठेवलेल्या आहेत. तर मागे भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्यासह काही नेत्यांचे फोटो या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे. त्यावर आता दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांकडून एकमेकांवर ताशेरे ओढले जात आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List