महाराष्ट्र शासनाचा ‘मेटा’सोबत करार, नागरिकांना 500 सेवा मिळणार व्हॉट्सअॅपवर, मुख्यमंत्र्यांची घोषणा
महाराष्ट्र शासनाने जगातील सर्वात मोठी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी ‘मेटा’सोबत करार केला आहे. यामुळे शासनाच्या 500 सेवा आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामुळे लोकांना कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. वरळी येथे ‘परिवहन भवन’ या नव्या इमारतीचे भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
परिवहन विभागातील तो प्रकार शिंदे साहेबांमुळे बंद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिंदे साहेबांकडे परिवहन विभाग आला तेव्हा त्यांनी अनेक बदल केले. त्यांनी परिवहन विभाग ज्या कारणासाठी बदनाम झाला होता, तोच प्रकार रद्द केला. परिवहन विभागातील सर्व बदल्या ऑनलाइन स्वरूपात सुरु केल्या. त्यामुळे पारदर्शकता आली. ऑनलाइन पद्धत सुरु केली आहे आणि भ्रष्टाचार बंद केला. शिंदे साहेबांच्या काळात हा निर्णय घेतला गेला.
देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ व टीमचे कौतूक केले. ते म्हणाले, राज्याच्या परिवहन विभागाला तब्बल ८५ वर्षानंतर स्वत:चे हक्काचे कार्यालय मिळाले. त्यासाठी या सर्वांनी जागा शोधली आणि काम सुरू केले. आता या ठिकाणी पुढील परवानगीसाठी आपण संरक्षण विभागाला पत्र देणार आहे. परंतु या इमारतीच्या 16 व्या मजल्यावर मला, शिंदे साहेब आणि अजितदादांना केबीन द्या (हंशा)
राज्यात परिवहन विभागाने अपघात कमी करण्यासाठी ज्या योजना सुरू केल्या आहेत. त्याही अतिशय चांगल्या आहेत. तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, इतके वर्ष परिवहन विभागाला कार्यालय नव्हते. परंतु आता परिवहनला गती देणारा एक नवा अध्याय तुम्ही सुरु केला आहे. प्रताप सरनाईक यांचा जो स्पीड आहे टू स्पोर्ट्स कार पेक्षा जास्त आहे. एसटी तोट्यात आहे. पण एसटीला आपण सरकारकडून अनुदान देतो. देशात राज्यात मृत्यूचे अपघात मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. परंतु समृद्धही महामार्गामुळे अपघात ३५% कमी झाले आहे. त्या ठिकाणी आपण ब्लॅक स्पॉट दूर केले. कारवाई सुरु केलेली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List