प्रार्थना बेहरे आहे 15 – 20 मुलांची आई; म्हणाली, ‘माझा मोठा मुलगा लग्नाआधीच…’

प्रार्थना बेहरे आहे 15 – 20 मुलांची आई; म्हणाली, ‘माझा मोठा मुलगा लग्नाआधीच…’

अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका आणि ‘मितवा’ सिनेमामुळे प्रार्थनाच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. आज प्रार्थना हिला कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. दरम्यान, अभिनेत्रीने तिच्या मुलांबद्दल मोठा खुलासा केला होता. प्रार्थना आणि तिच्या पतीने लग्नानंतर मुल न होऊ देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं. आता देखील अभिनेत्री नुकताच झालेल्या एका मुलाखतीत तिच्या मुलांबद्दल आणि मुल न होऊ देण्याचं कारण सांगितलं आहे.

मुलाखतीत प्रार्थना हिला विचारण्यात आलं की, ‘आम्ही असं ऐकलंय की, तू 15 – 20 मुलांची आई आहेस आणि तू हे लपवून ठेवलंय’? यावर प्रार्थनानं दिलेलं उत्तर सध्या तुफान चर्चेत आहे. प्रार्थना म्हणाली, ‘मी यापूर्वी देखील सांगितलं आहे. मला 15 – 20 आहेत. एवढंच नाही तर, एका मुलगा तर लग्नाआधी देखील होता… त्याचं नाव गब्बर आहे. तो माझा सर्वात मोठा डॉग…’

 

 

‘आमच्या घरी सात डॉग्ज आहेत. फार्महाऊसवर पण अनेक श्वान आहेत. तसंच फार्महाऊसवर गायी आणि घोडे देखील आहे. 10 – 12 घोडे आहेत. हिच आमची मुलं. यांचाच सांभाळ करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. सगळ्यांचा सांभाळ करणं फार कठीण आहे.’

‘इच्छाशक्ती असली की हे शक्य होतं. आम्हाला मणुष्याची मुलं नकोत… त्यामुळे मी आणि माझ्या नवऱ्यानं ठरवलं आहे की, हिच आपली आपली मुलं आहेत.’ असा खुलासा प्रार्थना हिने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत केला आहे.

 

 

प्रर्थना बेहरे हिच्या पतीचं नाव अभिषेक जावकरशी असं आहे. 14 नोव्हेंबर 2017 मध्ये प्रार्थना आणि अभिषेक यांनी मोठ्या थाटात लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तरूणीचं खेळकर आयुष्य क्षणात उद्ध्वस्त, रेल्वे मंत्र्यांनी सहानुभूती दाखवावी – मुंबई हायकोर्टाची टिप्पणी तरूणीचं खेळकर आयुष्य क्षणात उद्ध्वस्त, रेल्वे मंत्र्यांनी सहानुभूती दाखवावी – मुंबई हायकोर्टाची टिप्पणी
मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना मानवी पीडेच्या दुर्मिळ प्रकरणांपैकी एका प्रकरणात सहानुभूतीपूर्वक नुकसान भरपाईचा विचार करण्यास सांगितले आहे. हे प्रकरण...
नवऱ्याने होळी का साजरी केली नाही? विचारणाऱ्यांना स्वरा भास्करचं सडेतोड उत्तर
नाना पाटेकरांच्या चित्रपटाचा ओटीटीवर बोलबाला; भारतात नंबर 1 वर होतोय ट्रेंड
ओव्हरॲक्टिंगचे पैसे कापा.. 16 वर्षांच्या मुलाच्या इशाऱ्यानंतर भडकली मलायका अरोरा, नेटकऱ्यांनी थेट सुनावलं, Video
हिना खानवर किमोथेरपीचे साइड इफेक्ट्स; फोटो पोस्ट करत ट्रोलर्सना सुनावलं
सानिया मिर्झासोबत घटस्फोट, आता शोएब मलिकचं कसं आहे मुलासोबत नातं? ‘मुलाच्या कस्टडीमुळे… ‘
एकदा संपलं की संपलं..; झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेनं निरोप घेतल्यानंतर अभिनेता भावूक