‘तो माझ्या मागे कुणाला तरी डेट करत होता’, महिमा चौधरीचा खासगी आयुष्यावर मोठा खुसाला
'परदेस' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे महिमा चौधरी. या पहिल्याच चित्रपटाने महिमाला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले होते. महिमा तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे देखील कायमच चर्चेत राहिली आहे. महिमाच्या आयुष्यात मुलीच्या जन्मावेळी मोठी उलथा-पालथ झाल्याचे तिने सांगितलं. आता नेमकं काय झालं होतं? चला जाणून घेऊया...
महिमा लिएंडर पेससोबत रिलेशनशीपमध्ये होती. जवळपास तीन वर्षे त्यांचे रिलेशन सुरु असल्याचे म्हटले जात होते. पण त्या दोघांचा ब्रेकअप का झाला? याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. सध्या सोशल मीडियावर महिमाची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. या मुलाखतीमध्ये ती ब्रेकअपविषयी बोलताना दिसत आहे.
'जेव्हा मला कळाले की तो माझ्या मागे दुसऱ्या कोणाला तरी डेट करत आहे तेव्हा मला मोठा धक्काच बसला. तो माझ्या आयुष्यातून निघून गेल्यावर माझ्या आयुष्यावर फारसा काही परिणाम झाला नाही. माझ्या आयुष्यात काही बदल झाले नाहीत' असे महिमा म्हणाली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List