या अभिनेत्रीने लावलेल्या एवढाशा हेयर क्लिपची किंमत स्मार्टफोनच्या किंमतीएवढी; शाही लाइफस्टाइल जगणारी बॉलिवूड डिवा

या अभिनेत्रीने लावलेल्या एवढाशा हेयर क्लिपची किंमत स्मार्टफोनच्या किंमतीएवढी; शाही लाइफस्टाइल जगणारी बॉलिवूड डिवा

बॉलिवूडमध्ये जसं चित्रपट, अभिनय याला जसं महत्त्व आहे. तेवढंच महत्त्व हे फॅशनला, स्टाईललाही आहे. बॉलिवूडमध्ये अशी एक अभिनेत्री आहे जिला फॅशन क्वीन म्हटलं जातं. ही अभिनेत्री चित्रपटांमध्ये कमी दिसत असली तरी, ती तिच्या स्टाईल आणि लक्झरी लाइफस्टाइलसाठी नेहमी चर्चेत असते.

हेअरक्लिची किंमत जाणून धक्का बसेल

या अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने लावलेली हेअरक्लिची किंमत एखाद्या स्मार्टफोनच्या किंमतीएवढी आहे. या हेअरक्लिची किंमत ऐकून कोणालाही धक्का बसेल. ही फॅशन क्वीन म्हणजे सोनम कपूर. सोनम नेहमीच तिच्या फॅशन, लक्झरिअस लाईफस्टाईल आणि तिच्या ब्रँडेड वस्तूंसाठी ओळखली जाते. सोनम कपूरला बॉलिवूडची फॅशन आयकॉन मानलं जातं. तिच्या प्रत्येक लूकमध्ये एक लक्झरी टच असतो आणि ती नेहमीच आंतरराष्ट्रीय ब्रँडचे कस्टमाइज्ड आउटफिट्स आणि अॅक्सेसरीज वापरताने दिसते.

35000 ते 40000 रुपयांची हेअरक्लिप

अलिकडेच सोनम कपूरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने डायर (Dior)ची हेअरक्लिप केसांना लावलेली दिसत आहे. साधारणपणे, आपण पाहतो की केसांच्या क्लिपची किंमत 10 रुपयांपासून सुरू होते. जर एखाद्या ब्रँड जरी आपण क्लिप घेतली तरी त्याची किंमत सुमारे 100 ते 150 रुपये किंवा अगदी 200 ते 500 पर्यंत. पण सोनम कपूरच्या हेअरक्लिपची किंमत जाणून कोणालीही धक्का बसेल. एका व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की सोनमने घातलेल्या हेअरपिनची किंमत सुमारे 35000 ते 40000 रुपये आहे, जी एका स्टायलिश बॅग किंवा स्मार्टफोनच्या किंमतीइतकी नक्कीच आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)


सोनम कपूरच्या कलेक्शनमध्ये लक्झरी ब्रॅंड 

सोनम कपूरचा पती आनंद आहुजा हा एक यशस्वी उद्योगपती आहे, ज्यांची एकूण संपत्ती कोट्यवधींमध्ये आहे. तसेच एका रिपोर्टनुसार सोनम कपूरची100 कोटींहून अधिक संपत्ती आहे. सोनम कपूरने डायर ब्रँडची जाहिरात करण्याची ही पहिलीच वेळ नाही. ती अनेकदा या आंतरराष्ट्रीय ब्रँडचे कपडे, बॅग्ज आणि अॅक्सेसरीज घालताना दिसते. तिने अनेक वेळा डायर फॅशन शोमध्ये स्पेशल गेस्ट म्हणूनही सहभाग नोंदवला आहे. सोनमकडे केवळ कपडेच नाहीत तर महागडे दागिने आणि लक्झरी अॅक्सेसरीजचाही मोठं कलेक्शन आहे. तिच्या कलेक्शनमध्ये Hermès, Chanel, Louis Vuitton, और Cartier सारख्या टॉप ब्रँडचे दागिने आणि बॅग्ज पाहायला मिळतात.

लूकमध्ये क्लासिक आणि रॉयल टच  

सोनम कपूर रेड कार्पेटवर असो किंवा कॅज्युअल इव्हेंटमध्ये असो, तिच्या प्रत्येक लूकमध्ये एक क्लासिक आणि रॉयल टच असतो. ही डायर हेअर क्लिप तिची मिनिमलिस्ट पण शोभिवंत शैली देखील दर्शवतो. सोनम कपूरने ही हेअरक्लिप घातलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहते आणि फॅशन तज्ञांनी त्याला “सिंपल पण एक्सपेंसिव” लूक म्हटलं आहे. या डायर हेअर क्लिपने पुन्हा एकदा सिद्ध केले की सोनम कपूर ही बॉलिवूडची खरोखरंच फॅशन क्वीन आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam A Kapoor (@sonamkapoor)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

डोकेदुखीची समस्या होईल दूर, आहारामध्ये ‘या’ पदार्थांचे करा सेवन… डोकेदुखीची समस्या होईल दूर, आहारामध्ये ‘या’ पदार्थांचे करा सेवन…
आयुर्वेदामध्ये असे अनेक वनसपतींबद्दल सांगितले आहेत ज्याचे सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. बदलत्या ऋतूमध्ये तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष...
शरद पवार गटात पुन्हा राजकीय भूकंप?, जयंत पाटील असं काय बोलले हसन मुश्रीफांकडे? मुश्रीफांचा दावा काय?
550 कोटींची मालक फोटोतील ही लहान मुलगी, एका चित्रपटासाठी घेते 15 कोटी, परिवारात अनेक सुपरस्टार्स
बदलत्या हवामानात फ्लूची समस्या सतावतेय, फक्त ‘या’ छोट्या गोष्टींची घ्या काळजी
तुम्हाला कलिंगड खाण्याची योग्य वेळ माहिती आहे का? चला जाणून घेऊया तज्ञांचे मत…
महाराणा प्रताप यांचे वंशज अरविंद सिंह मेवाड यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन
Ratnagiri News – आगामी काळात शिवसेनेचे अस्तित्व दाखवूनच देऊ, अमोल किर्तीकर यांनी व्यक्त केला विश्वास