Satara News – जावळी तालुक्यात वणव्यात दोन आराम बस पेटल्या
जावळी तालुक्यात वणवे लावण्याचे सत्र सातत्याने सुरू आहे. रविवारी (दि. 16) दुपारी मेढा मोहाट पुलाजवळील मोहाट व पिंपरी गावच्या हद्दीतील डोंगराला लावलेल्या वणव्याने परिसरात उभ्या असलेल्या दोन आराम बस अक्षरशः जळून राख झाल्या. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, वणवे आता मानवी वस्तीत घुसू लागल्याने चिंता वाढली आहे. मेढा मोहाट पुलाजवळ मोहाट गावच्या हद्दीत बिगरशेती केलेली प्लॉटिंगची जमीन आहे. या ठिकाणी काही लोकांनी घरे बांधलेली आहेत. याच ठिकाणी मोकळ्या जागेत काही वर्षांपासून दोन मोठ्या आराम बस उभ्या आहेत. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने लावलेल्या वणव्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात आग भडकली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List