नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेमार्ग सरळ मार्गानेच झाला पाहिजे, मुंबईतील बैठकीत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची एकजूट

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेमार्ग सरळ मार्गानेच झाला पाहिजे, मुंबईतील बैठकीत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची एकजूट

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गाच्या प्रस्तावित बदलांना विरोध करण्यासाठी आज मुंबईत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत रेल्वेमार्गाच्या प्रस्तावित बदलांवर चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यात आली. तसेच सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गातील सर्व लोकप्रतिनिधी पक्षीय मतभेद विसरून एकत्र आले. या भागाच्या विकासासाठी सर्वांनी एकजूट दाखवली.

या बैठकीत सर्व लोकप्रतिनिधींनी येत्या आठवड्यात मुख्यमंत्री फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. त्याचसोबत रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याची रणनीती ठरविण्यात आली आहे, असे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले.

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गामध्ये प्रस्तावित बदल करण्यात आल्याने स्थानिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. रेल्वे मार्ग पूर्वीप्रमाणेच ठेवण्याची मागणी जोर धरत आहे. या पाश्र्वभूमीवर सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सत्यजित तांबे, आमदार दिलीप वळसे-पाटील, अमोल खताळ उपस्थित होते, तर खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार अमोल कोल्हे, आमदार बाबाजी काळे आणि आमदार शरद सोनावणे.

विरोध होण्याची कारणे

■ पुणे – नाशिक रेल्वे प्रकल्प सरळमार्गे न केल्यास वाढणारे अंतर जवळपास 70-80 कि.मी. आहे, तर वाढणारा वेळ हा जवळपास दीड तास जास्त आहे. हा प्रकल्प सरळमार्गे न केल्यास ‘सेमी हायस्पीड’ हा मूळ उद्देश फोल ठरेल.

■ पुणे-नाशिक मुंबई हा सुवर्ण त्रिकोण साध्य करण्यासाठी पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प सरळ मार्गेच होणे गरजेचे आहे.

■ ‘जीएमआरटी’ मुळे निर्माण होणारी अडचण बोगदा किंवा इतर पर्यायाने सोडवता येणे शक्य आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

या खात्याचे पैसे ‘लाडक्या बहिणी’कडे वळवले; मंत्र्यांचा संताप, दिला थेट इशारा या खात्याचे पैसे ‘लाडक्या बहिणी’कडे वळवले; मंत्र्यांचा संताप, दिला थेट इशारा
ज्या कुटुंबातील महिलांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू...
weight loss tips: फॅटला छुमंतर करण्यासाठी रोज रात्री प्या ‘हे’ हर्बल टी
उन्हाळ्यात आरोग्यासाठी दही की योगर्ट अधिक फायदेशीर? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
नियमित दही खाणे उत्तमच, पण कोणत्या वेळेत खावे, फायदा जाणून घ्या…
अर्धापूर-नांदेड मार्गावर कार- ट्रकचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, सहा जखमी
परीक्षेत कमी गुण मिळाले, भविष्याच्या चिंतेतून पित्याने दोन मुलांना संपवून स्वतःची जीवनयात्रा संपवली!
लंडनमध्ये हायगेट स्मशानभूमीत 16 मार्चला डॉ. अशोक ढवळे यांचे कार्ल मार्क्स स्मृती व्याख्यान