आमदारांपेक्षा सभागृह नेत्यांवर प्रशासक मेहेरबान; महापालिकेच्या अंदाजपत्रकात सत्ताधारी माजी नगरसेवकांनाही झुकते माप

आमदारांपेक्षा सभागृह नेत्यांवर प्रशासक मेहेरबान; महापालिकेच्या अंदाजपत्रकात सत्ताधारी माजी नगरसेवकांनाही झुकते माप

महापालिकेच्या अंदाजपत्रकात आमदार, माजी नगरसेवकांच्या पत्रानुसार सुमारे 300 कोटींची कामे प्रस्तावित केली आहेत. मात्र, शहरातील काही आमदारांना तसेच काही ठरावीक नगरसेवकांना झुकते माप दिले आहे. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या तीन माजी सभागृह नेत्यांची चांदी झाली असून, त्यांनी मोठं घबाड पदरात पाडून घेतले आहे. सत्ताधारी पक्षातील इतर पदाधिकारी, नगरसेवकांना झुकते माप दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर केले. आमदार, माजी नगरसेवक आणि इच्छुकांकडून बजेटमध्ये 30 हजार कोटींच्या कामांची यादी दिली होती. आमदार, माजी नगरसेवकांच्या पत्रानुसार त्यानुसार प्रशासनाला योग्य वाटलेल्या सुमारे 300 कोटींची कामे प्रस्तावित केली आहेत. मात्र, निधी देण्यातही दुजाभाव केल्याचे समोर आले आहे.

काही माजी नगरसेवकांच्या प्रभागात 1 ते 2 कोटीपर्यंतच्या कामांचा समावेश प्रभागनिहाय अंदाजपत्रकात करण्यात आला आहे. या अंदाजपत्रकात आमदारांच्या पत्रानुसार 10 ते 15 कोटींपर्यंतचा निधी देण्यात आला असून, काही नगरसेवकांना 5 ते 10 कोटींचा निधी देण्यात आला आहे. सत्ताधारी पक्षाच्या एका माजी सभागृह नेत्याने तब्बल 28 कोटी, दुसऱ्या सभागृह नेत्याने 22 कोटींचा निधी घेतला असून, एका पदाधिकाऱ्याच्या प्रभागात जवळपास 18 कोटींचा निधी देण्यात आला आहे. याशिवाय कोथरूड मतदारसंघातील तीन माजी नगरसेवकांना प्रत्येकी 10 कोटींचा निधी मिळाला आहे.

भाजपच्या माजी सभागृह नेत्यांनीच केला माजी नगरसेवकांचा घात

यंदाचा अंदाजपत्रकात मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही भाजपच्या माजी नगरसेवकांना त्यांना आवश्यक निधी मिळेल असे आश्वासन दिल्याने यंदाचे अंदाजपत्रक वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. विरोधकांनीही भाजपछाप अंदाजपत्रकाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. मात्र, भाजपने माजी नगरसेवकांना अंदाजपत्रकात निधीची तरतुदीच्या याद्या माजी सभागृह नेत्यांकडे देण्यास सांगितल्या. मात्र, माजी सभागृह नेत्यांकडे आलेल्या याद्यांनुसार माजी नगरसेवकांना निधी देण्याऐवजी स्वतःच्या प्रभागात निधी पदरात पाडून घेतल्याची चर्चा आहे. भाजपच्या माजी सभागृह नेत्यांनीच | माजी नगरसेवकांचा घात केल्याचे बोलले जात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ओसामा बिन लादेनच्या घरी ‘या’ बॉलिवूड कलाकारांच्या सीडी! काय आहे नेमकी भानगड? ओसामा बिन लादेनच्या घरी ‘या’ बॉलिवूड कलाकारांच्या सीडी! काय आहे नेमकी भानगड?
बॉलिवूड कलाकरांची क्रेझ ही जगभरात असल्याचे पाहायला मिळते. या यादीमध्ये कधीकधी दहशतवाद्यांचा देखील समावेश असतो. आता बॉलिवूडमधील एका गायिकेचा दशततवादी...
लाडकी बहीण योजनेत दुरूस्ती करणार, अजित पवार यांनी विधानसभेत दिली मोठी अपडेट
Mumbai Crime News – एक वर्षापूर्वीच प्रेमविवाह, घरगुती वादातून पत्नीला संपवले, आरोपी पतीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
142 कोटी 58 लाखांची फसवणूक, टोरेस घोटाळा प्रकरणात 8 जणांविरोधात आरोपपत्र दाखल
Ratnagiri News – 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द करा, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे रत्नागिरीत धरणे आंदोलन
अजित दादांच्या आडून धनंजय मुंडेच पालकमंत्री पद बघताहेत? तृप्ती देसाई यांचा सवाल
Orry- सोशल मीडीया इन्फ्लुएन्सर ओरीविरुद्ध गुन्हा दाखल; वैष्णोदेवी मंदिर परिसरात ओरीने केले ‘हे’ कृत्य!