शिवरायांनी आधी बेईमान, गद्दारांना तलवारीचे पाणी पाजले; नंतर मुघलांना भिडले, मोदी-फडणवीसांचं नाव घेऊन संजय राऊत स्पष्टच बोलले

शिवरायांनी आधी बेईमान, गद्दारांना तलवारीचे पाणी पाजले; नंतर मुघलांना भिडले, मोदी-फडणवीसांचं नाव घेऊन संजय राऊत स्पष्टच बोलले

युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्राला इतिहास निर्माण करून दिला. बाकी सगळ्यांना भूगोल आहे, पण महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे इतिहास आहे. अशा शिवरायांच्या विचारांशी महाराष्ट्राने कायम इमान राखावा अशी आमची कायम भूमिका असते. हे राज्य शिवरायांच्या नावाने चालते, पण विचाराने चालले आहे का? असा प्रश्न अलिकडच्या काळात निर्माण झाला आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत सोमवारी सकाळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्या जाती, धर्म, पंथाचे आहेत हे पथ्य आपण पाळले पाहिजे. शिवरायांनी दिलेला विचार अन्यायविरुद्ध लढण्याचा, गद्दारी आणि बेईमानीविरुद्ध हल्लाबोल करण्याचा आहे. शिवरायांच्या काळात स्व‍कीयांमध्येही बेईमान, गद्दार होते. शिवरायांची पहिली लढाई चंद्रराव मोरे यांच्याशी झाली, औरंगजेब किंवा कुठल्या खानाशी नाही. आधी शिवरायांनी आपल्या आसपासचे बेईमान, गद्दार यांना तलवारीचे पाणी पाजले आणि मग ते मुघलांविरुद्ध लढण्यासाठी मोकळे झाले, असेही राऊत यावेळी म्हणाले.

औरंगजेबाच्या कबरीवरुन सुरू असलेल्या राजकारणावरही राऊत यांनी परखड शब्दात भाष्य केले. औरंगबेजाची कबर हटवण्यासाठी बजरंग दल, विहिंपचे आंदोलन सुरू आहे. पण महाराष्ट्रात, देशात त्यांच्याच पक्षाचे राज्य आहे. मोदी-फडणवीस ही त्यांच्याच विचारांची लोक आहेत. मग त्यांना अडवले कुणी? हे वातावरण खराब करून लोकांना त्रास देण्याऐवजी हिंमत असेल तर औरंजेबाची कबर काढण्यासाठी शासकीय अध्यादेश काढा. आज या क्षणी औरंगजेबाच्या कबरीभोवती केंद्राच्या पोलीस दलाचे संरक्षण आहे. मग ही नाटके कशाला? असा सवालही राऊत यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी काय शौर्य दाखवले त्याचे प्रतिक औरंगजेबाची कबर आहे. महाराष्ट्राशी पंगा घेण्याआधी त्या व्यक्तीने संभाजीनगरला जाऊन औरंगजेबाची कबर पहावी आणि मग आमच्या वाटाला जावे असे आम्ही सांगतो. शिवजारांनी औरंगजेबाची कबर तिथे खणलेली आहे, ती बघा मग महाराष्ट्राच्या नादाला लागा. अफझलखानाचा कोथळा शिवरायांनी काढला. प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याचे थडगे आहे. हा शौर्याचा इतिहास असून पुढच्या पिढीला ते माहिती पाहिजे. पण ही दिवटी पोरं असून इतिहास नष्ट करण्याचे काम सुरू आहे.

औरंगजेबाइतकेच फडणवीस क्रूर शासक, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी डागली तोफ

दरम्यान, कल्याणमध्ये शिवसेनेकडून साकारण्यात आलेल्या देखाव्यावर पोलिसांनी कारवाई केली. याचाही समाचार राऊत यांनी घेतला. शिवजयंती निमित्त शिवसैनिकांनी एखादा देखावा निर्माण केला असेल तर त्याच्यामध्ये पोलिसांनी किंवा सरकारने आक्षेप घ्यावे असे काय आहे? कल्याणमध्ये कधी अफझलखानाच्या देखाव्यावरून वाद होते, तर कधी शाहिस्तेखानाच्या देखाव्यावरून वाद होतो. गद्दारी, बेईमानी ही शिवरायांनाही कधीच मान्य नव्हती. त्याच्यावर काही देखावा किंवा चित्र निर्माण केले असतील तर पोलिसांनी हस्तक्षेप करण्याची गरज नाही. देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पोलिसांनी नरेंद्र मोदी यांचे पॉडकास्ट ऐकावे. मोदींनी फार जोरदारपणे सांगितले की टीका सहन केली पाहिजे. टीका सहन करणे लोकशाहीचे महत्त्वाचे अंग आहे. त्यामुळे टीका केली म्हणून पोलिसांनी देखावे उद्ध्वस्त करण्याचे कारण नाही, असा राऊत म्हणाले.

चारशे वर्षापूर्वीची कबर खणायला निघालेयत पण यांना तीन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत नाहीत; संजय राऊत यांचा घणाघात

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडितेनं घेतली एकनाथ शिंदेंची भेट, म्हणाली आरोपीला… स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडितेनं घेतली एकनाथ शिंदेंची भेट, म्हणाली आरोपीला…
काही दिवसांपूर्वी पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या एका बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला....
त्या विधानावर सपकाळ ठाम, पहा काय म्हणाले फडणवीसांबद्दल?
Photos: अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड, शेरा पोहोचला विधानभवनात; नेमकं कारण काय?
केदार शिंदे कडून ही अपेक्षा नव्हती, फक्त छपरी पोर…; सूरज चव्हाणच्या ‘झापूक झूपूक’चा व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण
विधानसभेच्या निवडणुकीत ईव्हीएम डुप्लिकेट, मतदार याद्या डुप्लिकेट म्हणून महायुतीचा विजयही डुप्लिकेट -अनिल देशमुख
पोलीस असल्याची बतावणी करत वृद्ध महिलेची फसवणूक, तीन महिन्यांत 20 कोटींना गंडा
बद्धकोष्ठता दूर करण्यापासून ते वजन वाढवण्यापर्यंत, ज्वारीची भाकरी खाण्याचे अगणित फायदे!!