Benefits Of Curd Rice- उन्हाळ्यात दही भात खाण्याचे आहेत खूप सारे फायदे! दही भातामुळे वजनही होईल कमी! सविस्तर वाचा
आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आपण अनेक पदार्थांचा आहारात समावेश करतो. परंतु दही भात हा एक असा पदार्थ आहे याला पाहून अनेकजण नाक मुरडतात. परंतु हाच दही भात दक्षिण भारतीयांची पहिली पसंती आहे. दही भात पचायला हलका असल्याने, त्याचे आरोग्यदायी फायदे सुद्धा भरपूर आहेत.
दह्यासोबत भात खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामुळेच सध्याच्या घडीला अनेकांनी आहारात दही भाताचा समावेश केलेला आहे. दही आणि भात खाल्ल्याने वजन कमी होते आणि हाडेही मजबूत होतात. दही आणि भात खाण्याचे आणखी अनेक फायदे काय आहेत ते जाणून घेऊया.
दही भात खाण्याचे फायदे-
वजन कमी करणाऱ्यांसाठी दही भात हा एक उत्तम पर्याय मानला गेला आहे. परंतु याजोडीला आवश्यक व्यायाम करणेही तितकेच गरजेचे आहे. दही भाताचा आहारात समावेश केल्यामुळे भूक कमी लागते. यामुळेच वजन कमी होण्यासही खूप मदत होते.
पचनाशी संबंधित समस्या असलेल्या लोकांसाठी दही भात हा एक उत्तम पर्याय आहे. दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स पचन सुधारतात आणि आतड्यात असलेल्या चांगल्या बॅक्टेरियाची रचना सुधारतात. याशिवाय, दही आणि भात खाल्ल्याने मासिक पाळीपूर्वी होणारी पोटदुखी मोठ्या प्रमाणात कमी होते.
दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करतात आणि शरीराला रोगांशी लढण्यास सक्षम करतात. म्हणूनच आहारामध्ये भात आणि दही जितके जास्त समाविष्ट कराल तितके जास्त शारीरिक फायदे मिळतात.
आहारतज्ज्ञांच्या मते दही हे ताण कमी करणारे आहे. दह्यामध्ये आढळणारे प्रोबायोटिक बॅक्टेरिया तणाव कमी करण्यास मदत करतात.
दही-भात शरीराचे तापमान कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. दही भातामुळे पोटाला आतून थंडावा प्राप्त होतो तसेच कॅल्शियम व्यतिरिक्त, दह्यामध्ये प्रथिने देखील जास्त प्रमाणात असतात.
दह्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळते, जे तुमच्या हाडे आणि दातांसाठी खूप महत्वाचे आहे. दही भात खाल्ल्याने हाडे आणि दात मजबूत आणि निरोगी होण्यास मदत होते.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List