‘तेव्हा ती माझी सून नव्हती…..’ ऐश्वर्या राय सोबत केलेल्या ‘आयटम सॉंग’वर अमिताभ बच्चन स्पष्टच बोलले
बॉलिवूडमध्ये तसे अनेक कपल त्यांच्या चित्रपटांपेक्षाही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहतात. त्यातीलच एक जोडी म्हणजे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन. ऐश्वर्या राय तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. मध्यंतरी अभिषेक बच्चनसोबतच्या तिच्या नात्याबद्दल आणि घटस्फोटाच्या अफव सतत येतच होत्या. मात्र त्यानंतर ही जोडी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांना एकत्र उपस्थित राहिलेले पाहिल्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा कमी होताना पाहायला मिळाल्या.
‘कजरा रे’ गाण्याचा किस्सा काय?
ऐश्वर्या राय एक अभिनेत्री म्हणूनही तेवढीच चर्चेत राहणारी आहे. तिचे अनेक चित्रपट आणि गाणी आजही तेवढीच प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक गाण म्हणजे ‘कजरा रे’. या गाण्यात अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चनही होते. याच गाण्याचा अमिताभ बच्चन यांनी एक अनुभव आणि तो किस्सा शेअर केला होता.
“तेव्हा ऐश्वर्या आमची सून नव्हती…”
‘कजरा रे’ हे गाण अतिशय लोकप्रिय झालं होतं आणि आजही आहे. ‘कौन बनेगा करोडपती 15’ च्या एका भागात स्पर्धकाशी संवाद साधताना अमिताभ बच्चन यांनी ‘कजरा रे’ च्या शूटिंगचा किस्सा सांगितला. बिग बींशी बोलताना जेव्हा स्पर्धकाने मिर्झा गालिब यांचा उल्लेख केला तेव्हा त्यांना ‘कजरा रे’ हे गाणं आठवलं. तेव्हा त्यांनी त्या गाण्यातील अभिषेक आणि सून ऐश्वर्यासोबतच्या शुटींगचा किस्सा सांगितला. ते म्हणाले की, ‘त्या गाण्यात आम्ही तिघे होतो.पण तेव्हा ऐश्वर्या आमची सून नव्हती, ती नंतर आमची सून झाली. पण ते गाणं शूट करताना खूप मजा आली सगर्वांनीच ते गाण खूप एन्जॉय केलं” अस म्हणत त्यांनी त्या गाण्याच्या कास्टींगची गंमत सांगितली.
‘बंटी और बबली’ चित्रपटातील ‘कजरा रे’ गाणं आजही प्रसिद्ध
2005 मध्ये आलेल्या ‘बंटी और बबली’ चित्रपटातील ‘कजरा रे’ हे प्रसिद्ध गाणे. या चित्रपटाचे दिग्दर्शन साद अली यांनी केलं होतं. या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. अभिषेकने 20 एप्रिल 2007 रोजी मित्र आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत ऐश्वर्या रायशी लग्न केलं. कामाबद्दल बोलायचं झालं तर, ऐश्वर्या शेवटची ‘पोन्नियिन सेल्वन: पार्ट 2’ या चित्रपटात दिसली होती. दुसरीकडे, अभिषेक बच्चनचा ‘बी हॅपी’ हा नवीन चित्रपट 14 मार्च रोजी ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.
Kajra Re song, Amitabh Bachchan, Aishwarya Rai Bachchan, Abhishek Bachchan, Bunty Aur Babli song, Bollywood behind the scenes, कजरा रे गाणे, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List