‘ते मला मरायाचे…’, सोनाक्षी सिन्हा भावांविषयी असं का म्हणाली?

‘ते मला मरायाचे…’, सोनाक्षी सिन्हा भावांविषयी असं का म्हणाली?

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही कायमच खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सोनाक्षीने बॉयफ्रेंड जहीर इक्बालशी लग्न करत सर्वांना चकीत केले. सुरुवातीला सोनाक्षीच्या आंतरधर्मिय लग्नाला सर्वांचा नकार होता. पण नंतर सोनाक्षीच्या लग्नात तिचे आई-वडील दोघेही उपस्थित असल्याचे पाहायला मिळते. मात्र, सोनाक्षीच्या लग्नाला भाऊ लव आणि कुश गैरहजर असल्याचे दिसले. आता अलिकडेच दिलेल्या मुलाखतीमध्ये सोनाक्षीने तिच्या भावंडांबद्दल प्रश्न विचारताच दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सोनाक्षीने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ती भावंडांविषयी बोलताना म्हणाली, ‘मी घरात सर्वात लहान. त्यामुळे मी सर्वांची लाडकी होते. या गोष्टीमुळे माझे भाऊ माझ्यावर प्रचंड जळायचे. त्यांनी अनेकदा मला मारलंही. जसे प्रत्येक घरात बहिण-भावाची भांडणे होतात. तशीच माझी लव आणि कुशसोबत भांडणे होत. पण हे अगदी नॉर्मल आहे.’

सोनाक्षीने काही महिन्यांपूर्वी मुंबईतील राहत्या घरात लग्न केले. त्यांचा विवाहसोहळा हा रजिस्टर पद्धतीने करण्यात आला. या लग्नासाठी कोणलाही धर्म बदलावा लागला नाही. सुरुवातीला चर्चा होती की सोनाक्षीच्या लग्नाला कुटुंबीयांचा विरोध आहे. मात्र, सोनाक्षीच्या लग्नात तिचे आई वडील, शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा दोघेही हजर होते. त्यांनी लेकीला आशिर्वाद दिली. मात्र, सोनाक्षीचे भाऊ या लग्नात गैरहजर होते. ते आजही सोनाक्षीशी बोलत नाहीत. पण सोनाक्षीने याबाबत कधीही तक्रार केलेली नाही. सोनाक्षी आणि जहीर सध्या आनंदाने एकत्र संसार करत आहेत. तसेच दोघांचेही त्यांच्या फिल्मी करिअरकडे लक्ष आहे.

सोनाक्षीने आंतरधर्मिय विवाह केल्यामुळे तिला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. मात्र, सोनाक्षी कधीही या ट्रोलिंगकडे लक्ष देत नाही. तिचे पूर्ण लक्ष हे तिच्या संसारावर आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

डोकेदुखीची समस्या होईल दूर, आहारामध्ये ‘या’ पदार्थांचे करा सेवन… डोकेदुखीची समस्या होईल दूर, आहारामध्ये ‘या’ पदार्थांचे करा सेवन…
आयुर्वेदामध्ये असे अनेक वनसपतींबद्दल सांगितले आहेत ज्याचे सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. बदलत्या ऋतूमध्ये तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष...
शरद पवार गटात पुन्हा राजकीय भूकंप?, जयंत पाटील असं काय बोलले हसन मुश्रीफांकडे? मुश्रीफांचा दावा काय?
550 कोटींची मालक फोटोतील ही लहान मुलगी, एका चित्रपटासाठी घेते 15 कोटी, परिवारात अनेक सुपरस्टार्स
बदलत्या हवामानात फ्लूची समस्या सतावतेय, फक्त ‘या’ छोट्या गोष्टींची घ्या काळजी
तुम्हाला कलिंगड खाण्याची योग्य वेळ माहिती आहे का? चला जाणून घेऊया तज्ञांचे मत…
महाराणा प्रताप यांचे वंशज अरविंद सिंह मेवाड यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन
Ratnagiri News – आगामी काळात शिवसेनेचे अस्तित्व दाखवूनच देऊ, अमोल किर्तीकर यांनी व्यक्त केला विश्वास