विरोधी पक्षात आयुष्य काढेन, पण नैतिकता सोडणार नाही; सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल

विरोधी पक्षात आयुष्य काढेन, पण नैतिकता सोडणार नाही; सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल

मला कधी कधी वाटतं बरं झालं पक्ष फुटला. जो पुरुष स्वतःच्या बायकोच्या गाडीमध्ये बंदूक ठेवतो आणि तिला अडकवतो. काही नैतिकता आहे की नाही? अशा व्यक्तीबरोबर मी पक्षात काम करू शकले नसते. एक वेळ विरोधी पक्षांमध्ये आयुष्य काढेन, परंतु नैतिकता सोडणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा आढावा बैठकीला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार शशिकांत शिंदे, बापू पठारे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे उपस्थित होते. अजित पवार यांचा गट आणि धनंजय मुंडे यांच्यावर सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, पक्षामध्ये अशा लोकांबरोबर मी काम करू शकले नसते. एक तर ते पक्षात राहिले असते नाहीतर मी बाहेर पडले असते, परंतु मी नैतिकता सोडली नसती. बीडमध्ये जा संतोष देशमुख यांच्या आईला भेटा. महादेव मुंडे यांच्या बायकोला भेटा. त्यांच्या लेकरांची काय चूक होती? पैसा आणि सत्तेच्या पुढे झुकणं बंद केले पाहिजे. अशा प्रवृत्तीच्या विरोधात लढलं पाहिजे.

एवढी वर्षे आपण सत्तेत राहिलो. आता आपण विरोधी पक्षात आहोत. अरे बापरे.. आता विरोधी पक्षात राहून संघर्ष करायचा का? केवढा मोठा प्रॉब्लेम, ही मानसिकता मनातून काढून टाकून संघर्षासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उभे राहिले पाहिजे अशी अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. नमस्कारऐवजी जय शिवराय! या पक्षाच्या नव्या भूमिकेचे त्यांनी जोरदार समर्थन केले. शिवराय म्हणजे शेती, शेतकरी, अर्थकारण, सामाजिक समीकरण हे सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेबद्दल आहे, असे त्या म्हणाल्या.

निवडणुकीत डुप्लिकेट मतदारांचा वापर…

पुणे जिह्यामध्ये आपल्या पक्षाचे अनेक आमदार डुप्लिकेट मतदारांमुळे पडले. दौंड आणि शिरूरमध्ये विरोधी गटाचे आमदार कसे निवडून आले, डुप्लिकेट मतांचा वापर कसा झाला आणि काही ठिकाणी खोटी आधार कार्डदेखील वापरण्यात आली याची मला माहिती झाली आहे. यासंदर्भात लवकरच आपण केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र देणार आहेत. त्याचबरोबर खोट्या आधारकार्डसंदर्भात जिल्हाधिकाऱयांची भेट घेणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

डरपोक मंत्री, बायकोच्या आडून बोलतात..

राज्यातील एक मंत्री खूपच बोलत आहेत. परंतु ते बायकोच्या आड लपतात आणि बायकोच्या आडून बोलतात. हे डरपोक मंत्री कोण आहेत लवकरच संपूर्ण महाराष्ट्राला कळतील. चार-सहा महिन्यांत त्यांची विकेट पडेल, असा गौप्यस्फोट सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या बैठकीत केला. त्यामुळे हे मासे कोण याची चर्चा उपस्थितांमध्ये सुरू झाली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा
शंभर दिवसांत एक बळी गेला आहे. सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरद...
‘शिवा’ मालिकेत मोठा ट्विस्ट; सीताईने लावला शिवावर मोठा आरोप
शिवजयंतीपूर्वी ‘छावा’चा जगभरात डंका; बनवला वर्ल्डवाइड नवीन रेकॉर्ड
वयाच्या 59 व्या वर्षी सलमान खानही चढणार बोहल्यावर? भाईजानच्या ‘लव्ह लाईफ’बद्दल आमिर खानचा मोठा खुलासा
बडोदा कार अपघातप्रकरणी जान्हवी कपूरची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली ‘अशा प्रकारच्या वागण्याने..’
दहशतवादी अबू कतालच्या हत्येनंतर ‘हे’ 5 सिनेमे ट्रेंड, दहशतवाद्यांच्या घृणास्पद कृत्यांचा पर्दाफाश करणारे सिनेमे
शिवरायांनी आधी बेईमान, गद्दारांना तलवारीचे पाणी पाजले; नंतर मुघलांना भिडले, मोदी-फडणवीसांचं नाव घेऊन संजय राऊत स्पष्टच बोलले