तिरुपतीप्रमाणे पंढरीत श्री विठ्ठलाचे टोकन दर्शन, आषाढी यात्रेपूर्वी व्यवस्थेची चाचणी होणार

तिरुपतीप्रमाणे पंढरीत श्री विठ्ठलाचे टोकन दर्शन, आषाढी यात्रेपूर्वी व्यवस्थेची चाचणी होणार

श्री क्षेत्र पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविकांची गर्दी असते. आषाढी, कार्तिकी एकादशीला ही संख्या लाखोंवर जाते. तासन्तास भाविक दर्शनरांगेत उभे असतात. भाविकांना देवाचे झटपट दर्शन मिळावे यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरातही टोकन दर्शन व्यवस्था राबवण्यात येणार आहे. येत्या आषाढी यात्रेपूर्वी या व्यवस्थेची चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास येथे आज मंदिर समितीची सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी मंदिर जतन व संवर्धन कामांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये सध्या गाभारा, बाजीराव पडसाळी, सभामंडप व इतर अनुषंगिक ठिकाणी सुरू असलेली सर्व कामे आषाढी यात्रेपूर्वी पूर्ण करून घेण्यात येणार आहेत. दगडी कामास कोटिंग करणे व वॉटर प्रूफिंगची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. याशिवाय, श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्याचे प्रस्तावित असून, त्याची आषाढी यात्रेपूर्वी चाचणी घेण्यासाठी व मंदिर समितीचे कार्यालयीन कामकाज गतिमान करण्याच्या दृष्टीने विविध प्रकारच्या संगणक प्रणाली सेवाभावी तत्त्वावर मोफत उपलब्ध करून देण्याची मंदिर समितीची विनंती टीसीएस कंपनीने मान्य केली आहे. त्यामध्ये ऑनलाइन डोनेशन, भक्तनिवास बुकिंग, पूजा बुकिंग, लाईव्ह दर्शन व इतर अनुषंगिक बाबींसाठी संगणक प्रणालीचा समावेश आहे.

प्रतिवर्षी चैत्र शुद्ध 11 कामदा एकादशी दिवशी चैत्री यात्रा भरते. यावर्षी चैत्री एकादशी 4 एप्रिलला संपन्न होत असून, यात्रेचा कालावधी 2 ते 12 एप्रिल असा आहे. या यात्रा नियोजनाचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये या यात्रेला येणाऱ्या भाविकांना आवश्यक सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

थोरले मुंडे असते तर धनंजय मुंडेंना चाबकाने फोडले असते, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने सुनावले, अजितदादांना केले हे आवाहन थोरले मुंडे असते तर धनंजय मुंडेंना चाबकाने फोडले असते, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने सुनावले, अजितदादांना केले हे आवाहन
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो, व्हिडिओ समोर आल्याने समाज हेलावले आहे. राज्यभरात संतापाची लाट उसळली...
धनंजय मुंडे राजीनामा द्या, आता सर्वोच्च आदेश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह बड्या नेत्यांची चर्चा
‘त्याला मिशी-दाढी अन् तो चहा पिणारा…’; प्राजक्ता माळीचा होणारा नवरा असा असणार
‘छावा’मधून डिलिट केलेला लेझीम डान्स व्हायरल; नेटकरी म्हणाले “आमचं दुर्दैव..”
मोहम्मद सिराज ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री? रिलेशनशिपबद्दल अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य
“ती आयटम जातच नाही..”; विवाहबाह्य संबंधाबद्दल गोविंदाच्या पत्नीचं वक्तव्य चर्चेत
‘छावा’ सिनेमाला मोठा फटका, 18 व्या दिवशी प्रेक्षकांनी फिरवली पाठ, कमाईचा आकडा इतक्या कोटींनी मंदावला