रात्री झोपताना केस मोकळे ठेवावे की बांधावे? जाणून घ्या योग्य पद्धत

रात्री झोपताना केस मोकळे ठेवावे की बांधावे? जाणून घ्या योग्य पद्धत

केसांची निगा राखणे हे प्रत्येकासाठी आव्हान बनले आहे, धावपळीच्या जगात केसांची काळजी घेण्यास वेळ मिळत नाही . केस लवकर गळू लागतात किंवा पांढरे होण्यास सुरुवात होतात. त्यातच, अनेकांना प्रश्न पडतो की झोपताना केस मोकळे ठेवावेत की नाही ? योग्य पद्धतीने केसांची देखभाल न केल्यास ते गळतात, तटतात आणि कमजोर होतात,अनेक मोठ्या समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे या स्टोरीत आपण जाणून घेऊया की रात्री केस कसे ठेवावेत.

केस मोकळे ठेवून झोपणे फायदेशीर की हानिकारक?

कोणी म्हणत केस मोकळे सोडून झोपावे तर कोणी म्हणत बांधून झोपावे. केस मोकळे ठेवून झोपण्याचे काही फायदे आहेत तर काही तोटेही आहेत. जर तुमचे केस रफ, लांब आणि जाड असतील, तर ते रात्री झोपताना अधिक गुंततील आणि तुटण्याची शक्यता वाढेल. तसेच केस उशाशी घासले गेल्याने त्यातील फ्रिझ वाढेल आणि केस निस्तेज होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो असे केस असतील तर ते बांधूनच झोपणे योग्य. मात्र, लहान आणि पातळ केस असतील, तर त्यांच्यावर बांधन न बांधन्याचा फारसा परिणाम होत नाही.

रात्री डोकं शांत असल्याने जर केस मोकळे ठेवले तर रक्ताभिसरण सुधारते आणि केसांच्या मुळांना योग्य पोषण मिळते, ज्यामुळे ते अधिक मजबूत होतात. परंतु, जर केस फारच गुंतत असतील, तर मोकळे ठेवण्याचा विचार पुन्हा एकदा करायला हवा.

रात्री झोपण्यापूर्वी या गोष्टी करणे टाळा 

१. केस घट्ट बांधून झोपणे- केस घट्ट बांधून झोपल्याने ते लवकर कमजोर होऊन गळू लागतात.

२. ओले केस घेऊन झोपणे- ओले केस ठेवून झोपल्याने केसात चिप-चिप वाढते व कोंड्याचे त्रास होतात

३. अस्वच्छ ऊशी घेऊन झोपणे- अस्वच्छ ऊशीवर झोपल्याने उशीतील जर्म्स आणि बॅक्टेरिया केसांना खराब करू शकतात

४. केसांना कोणतेही प्रोडक्ट्स लावून झोपणे टाळा- रात्री झोपण्यापूर्वी केसाला कोणतेही प्रोड्क्ट्स लावणे टाळा अन्यथा केस लवकर डॅमेज होऊ शकतात

रात्री केस बांधणे किंवा मोकळे ठेवण्याचा योग्य मार्ग

केस मोकळे ठेवण्याचा योग्य मार्ग 

१. जर तुम्हाला केस मोकळे ठेवून झोपायचे असतील, तर कॉटनऐवजी सिल्कच्या उशीचा वापर करा. सिल्कच्या उशीमुळे केस कमी घासले जातात आणि फ्रिझ कमी होतो.

२. झोपण्यापूर्वी केस सौम्य ब्रशने मोकळे करून झोपल्यास ते फारसे गुंतत नाहीत.

केस बांधून झोपायचे असल्यास 

१. केस बांधताना टाइट रबर बँड अथवा क्लिपचा वापर करू नका. यामुळे टाळूला ताण बसतो व केस लवकर कमजोर होतात.

२. चांगला पर्याय म्हणजे मऊ स्क्रंची वापरणे किंवा केस मोठी असल्यास सैल वेणी घालणे. यामुळे केस मोडण्याची शक्यता कमी होते.

३. केसांना थोडेसे तेल लावून हलक्या हाताने केस बांधून झोपा

केस मोकळे ठेवायचे की बांधायचे, याचा निर्णय तुमच्या केसांच्या जाडसरपणा किंवा लांबी यावर अवलंबून असतो. जर केस पातळ आणि लांब असतील, तर हलकी वेणी घालून झोपणे योग्य ठरेल, तर लहान केसांसाठी मोकळे ठेवणे त्रासदायक ठरणार नाही. योग्य पद्धतीने केसांची काळजी घेतल्यास ते निरोगी आणि सुंदर राहतील.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा
शंभर दिवसांत एक बळी गेला आहे. सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरद...
‘शिवा’ मालिकेत मोठा ट्विस्ट; सीताईने लावला शिवावर मोठा आरोप
शिवजयंतीपूर्वी ‘छावा’चा जगभरात डंका; बनवला वर्ल्डवाइड नवीन रेकॉर्ड
वयाच्या 59 व्या वर्षी सलमान खानही चढणार बोहल्यावर? भाईजानच्या ‘लव्ह लाईफ’बद्दल आमिर खानचा मोठा खुलासा
बडोदा कार अपघातप्रकरणी जान्हवी कपूरची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली ‘अशा प्रकारच्या वागण्याने..’
दहशतवादी अबू कतालच्या हत्येनंतर ‘हे’ 5 सिनेमे ट्रेंड, दहशतवाद्यांच्या घृणास्पद कृत्यांचा पर्दाफाश करणारे सिनेमे
शिवरायांनी आधी बेईमान, गद्दारांना तलवारीचे पाणी पाजले; नंतर मुघलांना भिडले, मोदी-फडणवीसांचं नाव घेऊन संजय राऊत स्पष्टच बोलले