किशमिश आणि मनुका सारखेच आहेत का? 90% लोकांना हा फरक माहित नसेल, आरोग्यासाठी कोणता अधिक फायदेशीर?
तुम्ही ड्राय फ्रुट्समध्ये किशमिशचा मोठ्या प्रमाणात वापर करत असाल. काळ्या, तपकिरी, पिवळ्या, हलक्या केशरी, हिरव्या किशमिशचे प्रकार दुकानांमध्ये तुम्ही पाहिले असतील. यासोबतच दुकानात आणखी एक पदार्थ असतो जो किशमिश सारखा दिसतो. पण तो किशमिश नसतो. तर तो पदार्थ मनुका असतो. जो पूर्णपणे किशमिश सारखाच दिसतो. दोन्ही पदार्थ दिसायला सारखे आहे पण वेगळे आहे. किशमिश आणि मनुका दोन्ही वेगळे पदार्थ आहेत.
किशमिश आणि मनुका मध्ये काय आहे अंतर?
द्राक्ष हे फळ सुकवून मनुका बनवतात. त्यात अनेक रंग, प्रकार आहेत. तुम्हालाही मनुका आणि किशमिश यांच्यात फरक करता येत नसेल तर काळजी करू नका. बरेच लोक त्यास एकच मानतात, परंतु तसे नाही. किशमिश आणि मनुका यामध्ये खूप फरक आहे.
किशमिश एक ड्राय फ्रुट आहे. तर औषध म्हणून मनुक्याचा वापर होतो. दोघांमध्ये पोषक तत्व वेगळे असतात. मनुका खाल्ल्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. तर किशमिश खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.
द्राक्षे सुकवून किशमिश बनवतात, तेव्हा द्राक्षांचे सर्व पोषक तत्व किशमिशमध्ये उतरतात. किशमिश तुम्ही ड्रायफ्रुड म्हणून खाता जे चवीला गोड असतं. तर मनुका देखील द्राक्ष सुकवून तयार करतात. पण ज्या द्राक्षांपासून मनुके तयार केले जातात ते आकाराने लहान असतात. मनुके औषधी कारणांसाठी देखील वापरले जातात. त्याची चवही गोड असते. यामुळे पोटाशी संबंधित समस्या दूर होतात. अपचन, गॅस, पचनाचे आजार प्रतिबंधित करते.
किशमिश आणि मनुक्यांच्या उंचीत देखील अंतर असतो. किशमिश छोटी द्राक्षे सुकवून बनवतात, तर मुनका थोडी मोठी आणि पिकलेली द्राक्षे सुकवून बनवतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे किशमिश मध्ये बिया नसतात पण मनुकामध्ये अनेक बिया असतात.
किशमिशमध्ये लोह, फायबर, प्रोटीन, कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 6 इत्यादी गुणधर्म असतात. तुम्ही दररोज 10-15 किशमिश खाऊ शकता. ज्यामुळे पचनक्रिया योग्य राहते. पोट भरलेले राहतं, ज्यामुळे तुम्हाला वारंवार भूक लागत नाही, अशा प्रकारे तुम्ही लठ्ठपणापासूनही दूर राहू शकता.
मनुका शरीरातील लोहाची कमतरता भरून काढते. कमी रक्तदाब असलेल्यांसाठीही मनुका फायदेशीर आहे. उच्च रक्तदाब असल्यास मनुका खाणं टाळा. मनुका हृदयासाठी फायदेशीर आहे. मनुका कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List