चिकन, मटन, अंड्यापेक्षा शक्तीशाली या डाळी, व्हिटॅमिन्स-प्रोटीन इतके मिळणार की विसरणार नॉनव्हेज
मसूर डाळ शरीरासाठी भरपूर पोषक असते. या डाळीमध्ये अंडी, मांस आणि मासे याच्यापेक्षा अधिक पोषक घटक आहेत. या दाळींमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून आणि आहार तत्ज्ञांकडून सांगितले जाते.
आहारतज्ज्ञ डॉक्टर आकांक्षा दीक्षित म्हणतात, मसूर डाळीतून भरपूर पोषक तत्वे मिळण्यासोबतच शरीर तंदुरुस्त राहते. हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. जेव्हा प्रथिनांचा उल्लेख केला जातो तेव्हा मनात पहिला विचार येतो तो म्हणजे चिकन, मटण, अंडी आणि मासे. परंतु शाकाहारी लोक याचे सेवन करत नाहीत, त्यामुळे त्यांनी रोज मसूराचे सेवन करावे.
मसूर डाळ डायट प्लॅनमध्ये असल्यावर शरीराला मुबलक प्रोटीन मिळत राहणार आहे. कारण आपल्या शरीराच्या विकासासाठी प्रोटीनची आवश्यक आहे. प्रोटीन व्यतिरिक्त, पोटॅशियम, आहारातील फायबर, लोह, व्हिटॅमिन बी6, मॅग्नेशियम, फोलेट आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म देखील त्यात आढळतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List