महाविकास आघाडीत ‘हम साथ साथ हैं’ नाही तर ‘हम आपके हैं कौन’ दिसले, फडणवीस यांचा जबरदस्त टोला
CM Devendra Fadnavis: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरु होत आहे. २६ मार्चपर्यंत हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. या अधिवेशाच्या पूर्वसंध्येला सरकारने आयोजित चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकाला. त्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना कानपिचक्या दिल्या. विरोधकांमध्ये एकी नसल्याचे त्यांनी दाखवून दिले. विरोधी पक्ष नेत्यांनी आपल्याकडे ९ पानांचे पत्र दिले. त्यात नऊ नेत्यांची नावे आहेत. परंतु त्यातील दोन नेत्यांनी सह्याच केल्या नाहीत. यामुळे महाविकास आघाडीत ‘हम साथ साथ हैं’ नाही तर ‘हम आपके हैं कौन’ असे चित्र आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावला.
काय म्हणाले मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधकांचे हे संपूर्ण पत्र वृत्तपत्रांच्या बातम्यांवर आहे. त्यावर सरकारने खुलासा दिला आहे. तो वाचला असता तर ९ पानांचे पत्र अर्ध्या पानावर आले असते. त्यांच्यात नाराजीनाट्य सुरु आहे. रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पत्रकार परिषदेत विजय वड्डेटीवार नव्हते. जयंत पाटील दिसले नाही.
फडणवीस पुढे म्हणाले, महायुतीचे नवीन सरकार बनल्यावर आम्ही संवाद सुरु केला. परंतु त्यांनी बहिष्कार टाकला. संवादाची सर्व दारे बंद केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहात दोन महत्वाच्या चर्चा आहे. त्यातील एक चर्चा ८ मार्च रोजी महिला दिनी होईल. तसेच संविधानावर दोन दिवस चर्चा होणार आहे.
हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे दर कमीच
हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात नंबर प्लेटचे दरात जीएसटी व नंबर प्लेट बसवण्याचे शुल्क आहे. इतर राज्यात वेगवेगळे शुल्क आकारले जात आहे. एकंदरीत बेरीज केल्यावर महाराष्ट्रातील नंबर प्लेटचे दर इतर राज्यांपेक्षा पाच ते दहा टक्के कमीच आहे.
माध्यमांनी एखादी बातमी दिली की त्याच्यातील दुसरी बाजूही दिली गेली पाहिजे. म्हणजेच एखादी बातमी आली दोन्ही बाजू समोर येतील आणि लोकांचे संभ्रम निर्माण होणार नाही.
खुर्चीवर नाराजी
महायुतीच्या पत्रकार परिषदेत खुर्चीवर रस्सीखेच झाली. मंत्र्यांसाठी खुर्च्या न लावल्याने प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. भाजपचे सर्व मंत्री आधीच येऊन व्यासपीठावर बसले होते. त्यामुळे नितेश राणे, जयकुमार रावल यांनी शिंदे यांच्या मंत्र्यांना बसायला खुर्ची दिली
हे ही वाचा…
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची ‘गुड न्यूज’
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List