मोठी बातमी! धनंजय मुंडेंवर दबाव वाढला? आता थेट केंद्रीय मंत्र्याकडून राजीनाम्याची मागणी

मोठी बातमी! धनंजय मुंडेंवर दबाव वाढला? आता थेट केंद्रीय मंत्र्याकडून राजीनाम्याची मागणी

करुणा शर्मा यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मला शंभर टक्के याबाबत माहिती मिळाली आहे, धनंजय मुंडे यांचा राजीनामा दोन दिवसांपूर्वीच घेण्यात आला आहे.  त्यामुळे उद्या अधिवेशनाआधी त्यांचा राजीनामा होईल असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे. करुणा शर्मा यांच्या दाव्यामुळे खळबळ उडाली असताना आता आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील मोठी मागणी केली आहे.

नेमकं काय म्हणाले आठवले? 

करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचे संबंध कसे आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. करुणा शर्मा यांना माहिती मिळाली असेल, मात्र त्याबद्दल माहिती नाही. पण एक गोष्ट खरी आहे की वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुख यांची हत्या केल्याची माहिती सीआयडीला मिळाली आहे, आणि त्यांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. मला असं वाटतं की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा मोठ्या प्रमाणात जवळचा संबंध होता, पण त्यांचा या हत्येशी काही संबंध नसेल. तसे काही पुरावे देखील नाहीत. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, त्याबाबत अजितदादांनी विचार करणं गरजेचं असल्याचं यावेळी आठवले यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, हत्येच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा कसलाही संबंध नाही, पण वाल्मिक कराड हा हत्येतील आरोपी आहे, कराड आणि धनंजय मुंडे यांचा जवळचा संबंध होता, त्यामुळे नीतिमत्तेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, तसा निर्णय अजित पवार यांनी घेतला पाहिजे, असं आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला होता. त्यावर देखील आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे अमित शाह यांना भेटले हा त्यांचा निर्णय आहे, ते उपमुख्यमंत्री आहेत. आम्ही कोणाला भेटायचं आणि कोणाला नाही, हे संजय राऊत यांनी सांगणं योग्य नाही, असं आठवले यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा
शंभर दिवसांत एक बळी गेला आहे. सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरद...
‘शिवा’ मालिकेत मोठा ट्विस्ट; सीताईने लावला शिवावर मोठा आरोप
शिवजयंतीपूर्वी ‘छावा’चा जगभरात डंका; बनवला वर्ल्डवाइड नवीन रेकॉर्ड
वयाच्या 59 व्या वर्षी सलमान खानही चढणार बोहल्यावर? भाईजानच्या ‘लव्ह लाईफ’बद्दल आमिर खानचा मोठा खुलासा
बडोदा कार अपघातप्रकरणी जान्हवी कपूरची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली ‘अशा प्रकारच्या वागण्याने..’
दहशतवादी अबू कतालच्या हत्येनंतर ‘हे’ 5 सिनेमे ट्रेंड, दहशतवाद्यांच्या घृणास्पद कृत्यांचा पर्दाफाश करणारे सिनेमे
शिवरायांनी आधी बेईमान, गद्दारांना तलवारीचे पाणी पाजले; नंतर मुघलांना भिडले, मोदी-फडणवीसांचं नाव घेऊन संजय राऊत स्पष्टच बोलले