‘खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली…’विद्या बालनच्या मराठमोळ्या डान्सवर चाहते फिदा
Vidya Balan Dance Video: अभिनेत्री विद्या बालनची बॉलिवूडमध्ये एक वेगळीच ओळख आहे. स्त्रीप्रधान चित्रपट यशस्वीपणे तोलून नेणारी अभिनेत्री म्हणून विद्या बालनकडे पाहिलं जातं. विद्याने नेहमीच आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. बॉलिवूड इंडस्ट्रीत तिने स्वत:चं असं एक खास स्थान निर्माण केलं आहे.
विद्या बालनचे रिल्स आणि व्हिडीओ नेहमीच चर्चेचा विषय
विद्या बालन सोशल मीडियावर देखील बरीच सक्रिय असते विशेषत: तिचे रिल्स. तिच्या सोशल मीडियावर ती रिल्स आणि व्हिडीओ टाकत असते. शिवाय विद्या बालन अनेकदा गाण्यांवर थिरकतानाही दिसते. आताही विद्याचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तिने पोस्ट केला आहे. ज्या व्हिडीओवर चाहत्यांकडून भरभरून कमेंट्स येत आहेत. तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी विद्याचं कौतुक करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत.
विद्याचा ‘खंडेरायाच्या लग्नाला…’ गाण्यावर कमाल डान्स
विद्या बालनने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडीओ हा डान्स व्हिडीओ आहे. मुख्य म्हणजे विद्याने डान्स केलेलं गाण हे मराठी असून तिने मराठी गाण्यावर ठसकेबाज ठेका धरला आहे. विद्याने ‘खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली’ या गाण्यावर मराठमोळा डान्स केलेला पाहायाला मिळत आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून चाहत्यांनी व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत विद्याने “नवरी नटली, सुपारी फुटली…”, या आशयाचे कॅप्शन दिलं आहे.
विद्याचा मराठमोळा लूक अन् एक्सप्रेशन्सवर चाहते फिदा
तसेच या गाण्यावर डान्स करताना विद्याने सुंदर एक्सप्रेशन्स दिले आहेत. एवढंच नाही तर तिने व्हिडीओसाठी अगदी मराठमोळा लूक केला आहे. सुंदर साडी, कपाळावर टिकली,अन् केसात गजरा माळून अगदी मराठमोळ्या लूकमध्ये विद्याने हा डान्स व्हिडीओ केला आहे. विद्या या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. विद्याच्या या व्हायरल व्हिडीओवर मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर, अमृता खानविलकर या मराठी सेलिब्रिटींनीही कमेंट्स करत तिचं कौतुक केलं आहे. विद्याचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या प्रचंड पसंतीस उतरला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List