सोनम कपूरने मुंबईची तुलना केली सगरेटशी, ‘सार्वजनिकरित्या सिगारेट ओढते बाकी…’

सोनम कपूरने मुंबईची तुलना केली सगरेटशी, ‘सार्वजनिकरित्या सिगारेट ओढते बाकी…’

दिल्ली येथील हवेची गुणवत्ता खालावली आहे. आता मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेची पतळी देखील खालावली आहे. यावर अभिनेत्र सोनम कपूर हिनो सोशल मीडियावर क्रिप्टिक पोस्ट केली आहे. ज्यामुळे सध्या सर्वत्र सोनम आणि तिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी अभिनेत्रीचं समर्थन केलं आहे, तर अनेकांनी अभिनेत्रीवर निशाण साधला आहे. अभिनेत्री प्रत्येक विषयावर स्वतः मत उघडपणे व्यक्त करते. यावेळीही सोनम हिने मुंबईच्या वक्तव्यावर मोठं वक्तव्य केलं आहे.

सोनम कपूरच्या पोस्टबद्दल बोलण्याआधी मुंबईतील हवेच्या गुणवत्तेबद्दल जाणून घेवू, मुंबईचा AQI 119 आहे, जो खूप वाईट आहे. जेव्हा हा आकडा 50 पेक्षा कमी असतो तेव्हा तो चांगला मानला जातो.

पोस्ट शेअर करत काय म्हणाली सोनम

इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, ‘मी वर्षातून कदाचित 15 दिवस सामाजिकरित्या सिगारेट ओढते. बाकीच्या वेळी मी एक श्वास घेणारी मुंबईकर असते. त्या हवेची चवही तशीच आहे. मुंबई मार्लबोरो लाईट होती. मार्लबोरो लाईट हा एका सिगारेट कंपनीचा ब्रँड आहे.’ या ब्रँडच्या चवीची तुलना सोनमने मुंबईच्या हवेशी केली आहे. मुंबईच्या हवेची चव आणि त्या सिगरेटची चव सारखीच असल्याचे अभिनेत्रीचे म्हणणं आहे.

सोमन कपूरची पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी अभिनेत्रीचं समर्थन केलं आहे. तर अनेकांनी अभिनेत्रीवर निशाणा साधला आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘किमान ती लोकांना निसर्गाबद्दल जागरूक करण्याचा प्रयत्न करत आहे.’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘दिल्लीत प्रदूषण फार आहे. पुढे काय होईल माहिती नाही…’

अनेकांनी अभिनेत्रीवर निशाणा देखील साधला. एक नेटकरी अभिनेत्रीला म्हणाला, ‘मुंबई सोड, लंडनला जा’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘महागड्या गाड्या वापरणं बंद करा… इलेक्ट्रीक गाड्यांचा वापर करा…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘तू मुंबईत राहत नाहीस मग का काळजी करतेस…’ सध्या सर्वत्र सोनमच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

सोनम  कपूर आता पूर्वीप्रमाणे मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तुर्किश नागरिकांचा जामीन अर्ज फेटाळला तुर्किश नागरिकांचा जामीन अर्ज फेटाळला
13 कोटींहून अधिक रुपयांच्या सोन्याच्या 16 बिस्किटांच्या तस्करीचा प्रयत्न करणाऱ्या दोघा तुर्किश नागरिकांचा जामीन अर्ज दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळला. बेकीर एकमेन...
मुंबईत आज घुमणार शिवरायांचा जयजयकार! गोरेगावमध्ये भव्य शिवजयंती उत्सव; शिवसेना मध्यवर्ती शाखेचे आयोजन
Raigad News – लक्झरी बसची दुचाकीला धडक, दोन तरुणांचा जागीच मृत्यू
वीज नाही, पाणी नाही; संपूर्ण देशात अंधार, पनामात नेमकं काय घडलं?
दीपक पूनिया आणि अंतिम पंघालला आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी हिंदुस्थानी टीममध्ये मिळालं स्थान
लाडकी बहीण योजनेमुळे शासकीय तिजोरीवर ताण, मंत्री दत्तात्रय भरणे यांचा महायुती सरकारला घरचा आहेर
डोकेदुखीची समस्या होईल दूर, आहारामध्ये ‘या’ पदार्थांचे करा सेवन…