सानिया मिर्झासोबत घटस्फोट, आता शोएब मलिकचं कसं आहे मुलासोबत नातं? ‘मुलाच्या कस्टडीमुळे… ‘
भारतीय टेनिस आयकॉन सानिया मिर्झा आणि पाकिस्ताचा माजी क्रिकेटर शोएब मलिक आता एकत्र नाहीत. लग्नाच्या 14 वर्षांनंतर सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. जानेवारी 2024 मध्ये सानिया हिने घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली. तर दुसरीकडे शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत संसार थाटला. आता नुकताच झालेल्या मुलाखतीत शोएब याने घटस्फोटानंतर लेक इजहान मिर्झा मलिक याच्यासोबत कसं नातं आहे. याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त शोएब आणि त्याच्या मुलाच्या नात्याची चर्ची रंगली आहे.
सांगायचं झालं तर, घटस्फोटानंतर मुलगा इजहान याची कस्टडी सानिया मिर्झा हिच्याकडे आहे. अशात शोएब मुलाला भेटू शकतो का? असा प्रश्न शोएब याला विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, ‘मुलासोबत जास्त वेळ नाही व्यतीत करु शकत. पण त्याच्यासोबत बाप – मुलापेक्षा मैत्रीचं नातं अधिक घट्ट आहे. कधीतरी मी देखील त्याला भाई म्हणून हाक मारतो.’
‘दुबईत मी त्याला महिन्यातून दोन वेळा तरी भेटतो… भेटल्यानंतर मी स्वतःला शाळेत सोडतो आणि आणतो… असं देखील शोएब म्हणाला. माझं माझ्या मुलासोबत फार चांगलं नातं आहे. रोज व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून आम्ही एकमेकांच्या संपर्कात असतो.’ असं शोएब मलिक म्हणाला.
रिपोर्टनुसार, 20 जानेवारी 2024 मध्ये शोएब याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केलं. तर आता सानिया मिर्झा सिंगल मदर म्हणून मुलाचा सांभाळ करत आहे. पण विभक्त होऊन देखील सानिया आणि शोएब मुलाला आई – वडील दोघांचं प्रेम मिळावं म्हणून प्रयत्न करत असतात.
माजी टेनिसपटू सानिया मिर्झा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत. आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर सानिया तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सानिया आणि शोएब यांनी लग्न केलं. दोघांना एक मुलगा देखील. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.
घटस्फोटानंतर सानिया मुलासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. सानिया सोशल मीडियावर देखील स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List