मला आता भीती वाटते…, दुसऱ्या लग्नाबद्दल अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य, तिने हनीमूनच्या रात्री नवऱ्याला पाठवलेलं तुरुंगात
Actress on her marriage Life: झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी खासगी आयुष्यात यातना सोसल्या. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे पूनम पांडे… बोल्ड आणि हॉट अभिनेत्री म्हणून पूनम पांडे हिची ओळख आहे. सोशल मीडियावर पूनमचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पण तिच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. रिपोर्टनुसार, पूनम हिने लग्नाच्या 12 व्या दिवशी नवऱ्याला तुरुंगात पाठवलं. हनीमूनच्या रात्रीच पूनम हिने नवऱ्या विरोधात तक्रार दाखल केली.
पहिलं लग्न अपयशी ठरल्यानंतर नुकताच झालेल्या मुलाखतीत पूनम हिला दुसऱ्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं. दुसऱ्या लग्नाबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘गेल्या दोन वर्षांपासून मी सिंगल आहे. मी माझ्या आयुष्यात प्रचंड आनंदी आहे. व्यक्तिशः मला असं वाटतं की मी या बाबतीत दुर्दैवी आहे. पण माझ्याकडे उत्तम कुटुंब आणि करिअर आहे. याचाच मला आनंद आहे. पण आता लग्नाची भीती वाटते. मी कोणावर विश्वास ठेवू शकत नाही…’ असं अभिनेत्री दुसऱ्या लग्नाबद्दल म्हणाली.
पूनम पांडे हिचं पहिलं लग्न
सोशल मीडियावर कायम आपल्या बोल्ड आणि हॉट अदांना चाहत्यांना घायाळ करणारी पूनम पांडे हिने घरगुती हिंसाचाराचा सामना केला होता. अभिनेत्रीने सॅम बॉम्बे नावाच्या व्यक्तीसोबत मुंबईत गुपचूप लग्न केलं होतं. पूनमने हनीमूनच्या रात्रीच पतीविरुद्ध पोलिसांत तक्रारही दाखल केली होती.
दाखल केलेल्या तक्रारीत पूनम हिने अनेक धक्कादायक गोष्टी मांडल्या होत्या, पती सॅम बॉम्बे याच्याकडून सतत होणाऱ्या मारहाणीमुळे अभिनेत्री ब्रेन हॅमरेजची शिकार झाली होती. अनेक शोमध्ये अभिनेत्रीने तिच्या खासगी आयुष्याबद्दल वक्तव्य केलं आहे.
सांगायचं झालं तर, कायम सोशल मीडियामुळे चर्चेत असणाऱ्या पूनमच्या लोकप्रियतेत ‘लॉक अप’ या शोमुळे मोठी वाढ झाली होती. सोशल मीडियावर देखील पूनम कायम सक्रिय होती. सोशल मीडियावर पूनम हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List