IPL 2025 – मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूला PCB ची कायदेशीर नोटीस, नेमकं प्रकरण काय?
इंडियन प्रीमियर लीगच्या अठराव्या हंगामाचे वेध क्रिकेटप्रेमींना लागले आहेत. 22 मार्चपासून नव्या हंगामाला सुरुवात होत आहे. जगातील सर्वात मोठ्या लीगसाठी जगभरातील दिग्गज खेळाडू हिंदुस्थानमध्ये दाखल झाले आहेत. या खेळाडूंचा आपापल्या फ्रेंयाजझींसोबत कसून सरावही सुरू झाला आहे. अशातच मुंबई इंडियन्सच्या एका स्टार खेळाडूला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कायदेशीर नोटीस पाठवल्याने खळबळ उडाली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा 30 वर्षीय खेलाडू कॉर्बिन बॉश याची लिझार्ड विलियम्स याच्या जागी बदली खेळाडू म्हणून मुंबई इंडियन्सच्या संघात निवड करण्यात आली आहे. आयपीएल खेळाडूसाठी कार्बिनने पाकिस्तान सुपर लीगवर पाणी सोडले आहे. त्याने अखेरच्या क्षणी हा निर्णय घेतला. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डचा चांगलाच तिळपापड झाला आणि त्यांनी कॉर्बिनला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
कॉर्बिन बॉश हा पाकिस्तान सुपर लीगमध्ये पेशावर झल्मी संघाचा भाग होता. मात्र मुंबई इंडियन्सचा खेळाडू लिझार्ड विलियम्स जायबंदी झाल्याने त्याच्या जागी कॉर्बिनची निवड करण्यात आली. यामुळे कॉर्बिनने पीएसएलमधून माघार घेतली. यावर पीसीबीने नाराजी व्यक्त केली असून कराराच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. याबाबत पीसीपीने एक प्रसिद्धीपत्रकही जारी केले आहे.
पीसीबीला कसली भीती?
पाकिस्तान सुपर लीगचा आगामी हंगाम 11 एप्रिलपासून सुरू होत आहे, तर आयपीएलची सुरुवात 22 मार्चपासून होत आहे. कॉर्बिन बॉशविरुद्ध कोणताही कायदेशीर कारवाई केली नाही तर पीएसएलचा करार करून काही खेळाडू आयपीएलला प्राधान्य देतील, अशी भीती पीसीबीला वाटत आहे. त्यामुळे ही नोटीस पाठवून पीसीबीने उत्तर मागवले आहे.
कोण आहे कॉर्बिन बॉश?
कॉर्बिन बॉश हा दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू असून त्याने 1 कसोटी आणि 2 वन डे सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 5, तर वन डे मध्ये 2 विकेट घेतल्या आहेत. गोलंदाजीसह तो फलंदाजीही उत्तम करतो.
IPL 2025 – राजस्थान रॉयल्सच्या अडचणींमध्ये वाढ, संजू सॅमसनची दुखापत संघासाठी डोकेदुखी ठरणार
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List