Video: घटस्फोटीत अभिनेता पडला प्रेमात, गर्लफ्रेंडला नको तिकडे रंग लावताना पाहून संतापले नेटकरी
कलाकार म्हटले की लव्ह, अफेअर, लग्न, घटस्फोट या गोष्टी आल्याच. त्यांच्या खासगी आयुष्याची फार चर्चा सुरु असते. आमिर अली हा टीव्ही जगतातील सर्वात आवडता आणि लोकप्रिय अभिनेता आहे. तो अशा अभिनेत्यांपैकी एक आहे ज्याने चित्रपट आणि ओटीटी विश्वात पदार्पण करताच आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘क्या दिल में है’ आणि ‘F.I.R’मधील त्याची भूमिका विशेष गाजली होती. त्याच्या व्यावसायिक जीवनासोबत खासगी जीवनची विशेष चर्चा रंगलेली असते. आता हा अभिनेता ट्रोल होताना दिसत आहे.
काय आहे व्हिडीओ?
आमिर अलीने १० वर्षांपूर्वी अभिनेत्री संजीदा शेखसोबत लग्न केले होते. पण काही दिवसांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला. आता आमिर अंकिता कुकरेतीला डेट करत असल्याचे समोर आले आहे. धुलिवंदनाच्या दिवशी आमिर आणि अंकिता एकत्र दिसले. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये अंकिताने ब्लॅक शॉर्ट्स आणि जॅकेट घातले आहे. तर आमिरने राखाडी रंगाचा शर्ट घातला आहे. दोघेही एकमेकांकडे पाहात असतात. त्यानंतर आमिर हातात रंग घेतो आणि अंकिताच्या खांद्यावर, त्यानंतर मग छातीला-मानेला रंग लावतो. तो ज्याप्रकारे रंग लावतो ते पाहून सर्वजण अनेकांनी आमिरला ट्रोल केले आहे.
नेटकऱ्यांनी केले ट्रोल
सोशल मीडियावर आमिर अलीचा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने, ‘संजीदा खूप छान होती’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, ‘आमिर नावाच्या मुलांना झाले काय आहे… तिकडे आमिर खान मिस्ट्री गर्लला घेऊन फिरत आहे… हा आमिर अली पण विचित्र काम करतोय… आता देशात नवे वारे वाहात आहेत’ अशी कमेंट केली आहे.
आमिरने २०१२मध्ये केले होते लग्न
आमिर अलीने २०१२मध्ये संजीदा शेखशी लग्न केले होते. २०१९मध्ये त्यांना एक मुलगी झाली. तिचे नाव आयरा आहे. त्यानंतर २०२०मध्ये ते दोघे वेगळे होत असल्याच्या अफवा सुरु होत्या. पण २०२१मध्ये त्यांच्या घटस्फोटाने सर्वजण चकीत झाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List