घराच्या साफसफाईत सापडली लाखमोलाची कागदपत्रे
घराची साफसफाई करताना जुनी कागदपत्रे सापडून घरमालक मालामाल झाल्याची घटना चंदिगडमध्ये घडली. रतन ढिल्लो यांच्याकडे 37 वर्षांपूर्वींची कागदपत्रे सापडली. ते रिलायन्सचे शेअर होते, ज्याची किंमत 11 लाख रुपये आहे.
एका झटक्यात लखपती झाल्यामुळे रतन ढिल्लो यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी 1987 साली रिलायन्स इंडस्ट्रीचे शेअर खरेदी केले होते, अगदी मामुली दरात. आज त्या सगळ्या शेअरची किंमत लाखोंच्या घरात गेली आहे. रतन ढिल्लो यांनी हा सगळा प्रकार इंटरनेटवर शेअर केला. त्यावर नेटीजन्सने गमतीदार प्रतिक्रिया दिल्या. अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List