चार वर्षांच्या मुलाच्या फुप्फुसावर दुर्मीळ शस्त्रक्रिया; एम्सच्या डॉक्टरांचा चमत्कार
एम्सच्या बाल शल्य चिकित्सा विभागाच्या डॉक्टरांनी चार वर्षांच्या मुलावर दुर्मीळ शस्त्रक्रिया केली. चिमुरडय़ाच्या फुप्फुसाला जन्मापासून सूज होती. डॉक्टरांनी त्याच्या छातीची चिरफाड न करता दुर्बिणीच्या (थोरोस्कोप) मदतीने मुलावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांनी लहान छेद असलेल्या दुर्बिणीच्या मदतीने मुलाच्या फुप्फुसाचा वाढीव भाग काढून टाकला. दहा दिवसांपूर्वी ही शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतर दोन दिवसांनी मुलाला डिस्चार्ज मिळाला. त्याची प्रकृती आता चांगली आहे.
यासंदर्भात एम्सचे बालरोग सर्जन डॉ. विशेष जैन म्हणाले, बाळाची फुप्फुसं नीट विकसित झालेली नव्हती. एका बाजूला सूज होती. फुप्फुसांचे काम व्यवस्थित नव्हते. बाळ नीट श्वास घेऊ शकत नव्हते. त्याला वरचेवर निमोनिआ व्हायचा. म्हणून त्याच्या फुप्फुसावर सर्जरीची गरज होती. अशा प्रकरणांमध्ये साधारणपणे छाती खोलून सर्जरी केली जाते. मात्र बाळ अवघे चार महिन्यांचे होते. त्यामुळे त्याची छाती न खोलता एक सेंटीमीटर, पाच मिलीमिटर आणि 3 मिलीमीटरचे तीन छेद करून दुर्बिणीच्या मदतीने सर्जरी केली. एवढय़ा लहान मुलाची दुर्बिणीने सर्जरी करण्यात धोका असतो, असेही डॉक्टरांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List