Mahakumbh 2025- कतरिना कैफचा महाकुंभमध्ये स्नान करत असलेला व्हिडीओ व्हायरल.. रविना टंडनने केला संताप व्यक्त

Mahakumbh 2025- कतरिना कैफचा महाकुंभमध्ये स्नान करत असलेला व्हिडीओ व्हायरल.. रविना टंडनने केला संताप व्यक्त

महाकुंभची नुकतीच सांगता झाली. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान महाकुंभमेळा पार पडला. हा कुंभ गाजला तो अनेक कारणांनी, त्यातील एक महत्त्वाचे आणि गालबोट लावणारे कारण म्हणजे महाकुंभमधील महिलांच्या स्नानाचे काढण्यात आलेले व्हिडीओ! महाकुंभमधील महिलांच्या स्नानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर, सर्वच स्तरातून टिकेची झोड उठली. आता यात भर पडली आहे, अभिनेत्री  कतरिना कैफ हिच्या व्हिडीओची.

महाकुंभमध्ये अभिनेत्री कतरिना कैफ तिच्या सासूसमवेत संगम स्नानावर गेली असताना, कतरिना कैफचा व्हिडीओ काढण्यात आला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, बाॅलीवूडमध्येही यावरुन आता नाराजी पाहण्यास मिळत आहे. कतरिना कैफचा हा व्हिडीओ महाकुंभ झाल्यानंतर चर्चेचा विषय झालेला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mamaraazzi (@mamaraazzi)

महाकुंभमध्ये देशासह परदेशातील कोट्यवधी लोकांनी पवित्र स्नानाचा अनुभव घेतला. परंतु महाकुंभमधील पाण्याची गुणवत्ता याबरोबर महाकुंभमधील महिलांच्या स्नानाचे व्हिडीओ हे दोन्ही विषय खूप गाजले आहेत. कतरिना कैफ सासूसमवेत संगम घाटावरील पाण्यात उतरल्यावर तिचा तिच्या टीमकडून एक व्हिडीओ शूट करण्यात आला. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या दोन मुलांनीही हा व्हिडीओ शूट केला होता. हाच व्हिडीओ सध्याच्या घडीला सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून, अनेकांनी या घडलेल्या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. सदर व्हिडीओ काढणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता होऊ लागली आहे.

कतरिना कैफच्या व्हायरल व्हिडीओवर अभिनेत्री रविना टंडनने संताप व्यक्त केला आहे. रविना म्हणते, काही लोकांमुळे पवित्र क्षणांना गालबोट लागते. अशा प्रसंगाना कुठेही गालबोट लागता कामा नये, परंतु काही व्यक्तींमुळे या प्रसंगाची गंभीरता निघून जाते. असे म्हणत रविनाने त्या व्हिडीओ काढणाऱ्या तरुणांना चपराक लगावली आहे.

महाकुंभमध्ये देशातील सर्वसाधारण नागरिकांसमवेत प्रसिद्ध उद्योगपती, अभिनेता अभिनेत्री अशा अनेकांनी पवित्र स्नानाची अनुभूती घेतली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक; मुंडेंच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं? मोठी बातमी समोर फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक; मुंडेंच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं? मोठी बातमी समोर
मोठी बातमी समोर येत आहे, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे...
तारीख पे तारीख! देशभरातील न्यायालयांमध्ये 5.25 कोटींहून अधिक खटले प्रलंबित
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी तिघांना अटक, चौकशीसाठी अल्पवयीन मुलगा ताब्यात
मिंधे नाकर्ते आहेत हे वारंवार सिद्ध झालंच होतं, आज त्यावर शिक्कामोर्तब झालं! आदित्य ठाकरे यांचा घणाघात
राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रवृत्ती वाढल्या, मुख्यमंत्री मात्र मौन – सुनील प्रभू
विधानपरिषदेच्या 5 रिक्त जागेवर निवडणूक कार्यक्रम जाहीर; 27 मार्च रोजी मतदान प्रकिया
थकीत देण्यांच्या बोजाने एसटी वाकली, अर्थसंकल्पात आर्थिक पॅकेज जाहीर करा, कामगार युनियनची मागणी